करंजफेणच्या शेतकरी मंडळास वनश्री पुरस्कार
By admin | Published: August 10, 2016 12:55 AM2016-08-10T00:55:38+5:302016-08-10T01:07:38+5:30
नागपूर येथे ‘टायगर डे’ या आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला.
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत देण्यात येणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्कार राधानगरी तालुक्यातील करंजफेण येथील भारतीय शेतकरी ग्रामीण विकास मंडळास प्रदान करण्यात आला. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री, खासदार उपस्थित होते.मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव पाटील, सदस्या शैलेजा पाटील व समन्वयक मधुकर पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख ७५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
नागपूर येथे ‘टायगर डे’ या आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. यावेळी वृक्षलागवडीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. हा पुरस्कार वृक्षलागवडीसह जाणीवजागृतीचे काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेला देण्यात येतो. ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’साठी पुणे महसूल विभागातून प्रथमच ‘भारतीय शेतकरी ग्रामीण विकास मंडळा’ची पुरस्कारासाठी निवड झाली. यानंतर महाराष्ट्र राज्य पातळीवर मंडळास द्वितीय पुरस्कार देण्यात आला.