शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

By Admin | Published: June 7, 2017 12:28 AM2017-06-07T00:28:46+5:302017-06-07T00:28:46+5:30

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

The farmers will not apologize | शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर करणारच आहेत. त्यासोबत शेतकऱ्याला भविष्यात मदतीसाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत, यादृष्टीने ‘भाजप’ सरकार प्रयत्नशील आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या प्रवेशाने आजरा तालुक्यासह जिल्ह्यात भाजपा मजबूत झाली
आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खेडे येथे अण्णा-भाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन व अशोक चराटी यांच्या भाजप प्रवेशप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सूतगिरणीचे उद्घाटन झाले. कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस यांनी प्रास्ताविकात सूतगिरणीच्या वाटचालीचा आढावा घेतला.
अण्णा-भाऊ संस्था समूहाला सर्व प्रकारचे सहकार्य राहील, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादन खर्चात शासनाची भागीदारी व आलेल्या उत्पादनाला भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी संपन्न होणार
नाही.
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, सरकारकडून सूतगिरण्यांना दिला जाणारा पैसा हा सर्वसामान्यांचा पैसा आहे. मागील पंधरा वर्षांत भरमसाट सूतगिरण्यांना मान्यता देऊन सूतगिरणी उभी करणारे कार्यकर्ते पैशासाठी सत्तेसमोर झुलत राहिले पाहिजेत, अशी यंत्रणा राबविली गेली. १७०० कोटी रुपये शासनाने सूतगिरण्यांना दिले, पण किती सूतगिरण्या सुरू झाल्या हा संशोधनाचा विषय आहे.
आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भाजपच्या झंझावातामुळे अनेक राजकीय पक्षांची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर असून कोणी संघर्ष यात्रा तर कोणी आत्मक्लेश यात्रा काढत आहे. शेतकऱ्यांमध्ये केवळ संभ्रमावस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
चराटी म्हणाले, १९८९ ला नोंदणी झालेली सूतगिरणी खडतर प्रवासातून उभी राहिली. आजपर्यंत आपणाला कोणी जवळ केले नाही. परंतु, भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे आपण भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आजरा नगरपंचायतीसह तालुक्यातील विविध प्रकल्प मार्गी लावणे, कारखान्यात डिस्टीलरी प्रकल्प उभा करणे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
सरपंच वंदना कांबळे, भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, रवींद्र आपटे, गोपाळराव पाटील, बाबा देसाई, भरमूअण्णा पाटील, प्रकाश चव्हाण, डी. सी. काणे, समरजितसिंह घाटगे, अरुण देसाई, राहुल देसाई, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुधीर मुंज, मलिककुमार बुरूड, संजयबाबा घाटगे, दीपक सातोस्कर, अजित चराटी, विजयकुमार पाटील, शामली वाघ, सूतगिरणीसह अण्णा-भाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी व अधिकारी, संचालक, सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालक शंकर टोपले यांनी आभार मानले.
‘आजरा रोल मॉडेल’
आजरा सूतगिरणी हे या क्षेत्रात रोल मॉडेल असून या सूतगिरणीसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही देतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी चराटींनी भाजपात प्रवेश केला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे सहकारमंत्री देशमुख यांनी नमूद केले. जिल्ह्यातील प्रमुख मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आत भाजपव्यतिरिक्त काही शिल्लक असावे असे वाटत नाही, अशी टिप्पणीही सहकारमंत्री देशमुख यांनी केली.
३० सरपंच भाजपात !
चराटी यांच्यासह ३० गावचे सरपंच, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संभाजी बापट, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक नारायण सावंत यांच्यासह अण्णा-भाऊ संस्था समूहातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, केवळ या समूहाच्या महत्त्वूपर्ण योगदानामुळे आमदारकी भूषविणारे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शुभेच्छा देऊन तेथून निघून जाणे पसंद केले. त्याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती.

Web Title: The farmers will not apologize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.