सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी संपन्न होईल : पोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:22 AM2020-12-24T04:22:56+5:302020-12-24T04:22:56+5:30
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘सेंद्रीय शेती व विषमुक्त भारत'' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. किसान दिनाचे औचित्य ...
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘सेंद्रीय शेती व विषमुक्त भारत'' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. किसान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील बी.एस्सी विभागाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बी.व्ही.जी.चे प्रमुख मा. भालचंद्र पोळ आणि मा. तानाजी निकम लाभले.
कार्यशाळेत शहीद प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई पाटील, शहीद प्रसारक मंडळाचे अनिल पाटील, प्राचार्य प्रशांत पालकर, अनिल भांडवले, बी. एस्सी विभागाच्या प्राध्यापिका आणि कार्यशाळेच्या सहाय्यक स्नेहलता पाटील, राहुल कांबळे, विशाल किल्लेदार उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते तसेच शहीद संस्थेचे डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या प्रेरणेतून या मोहिमेची सुरुवात महाविद्यालयाने केली आहे.
या कार्यशाळेचे प्रास्तविक प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले, सूत्रसंचालन शैला मोरे, दीपाली लोहार यांनी केले.