शेतकरी ताकद दाखवून देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:54 PM2018-10-23T23:54:24+5:302018-10-23T23:54:36+5:30

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व ...

Farmers will show strength | शेतकरी ताकद दाखवून देतील

शेतकरी ताकद दाखवून देतील

Next

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होवू नये, यासाठी शेतमालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, असे विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक मंजूर झाले नाही, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपली ताकद दाखवून देतील, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकºयांच्या मेळाव्यात शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरंपच विष्णू गावडे होते.
शेट्टी म्हणाले, गुजरात राज्यासारखी एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा विचार सरकारचा आहे, असे उद्गार सहकारमंत्र्यांनी काढून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कायद्यानुसार एकरकमी रक्कम घेणार असून, जो कारखानदार सरकारची बाजू घेईल त्याला उसाचे दांडके दाखवू. देशातील व राज्यातील भाजपचे सरकार हे लबाड विद्वानांचे सरकार आहे. हिशोबात हे सरकार हुशार असल्याने ते शेतकºयांना हिशोबत फसवत आहेत. उसाच्या एफआरपीत २०० रूपये वाढ केली व त्यातील १८७ रूपये काढून घेतले. तोडणी वाहतूक हिशोबातील प्रतिटन ९७ रूपये शेतकºयांना तोट्यात घालण्याचे पापही या सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.
राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, गतवर्षीच्या उसाचा दर आम्ही तुमच्याकडे येऊन मागण्यापूर्वी तुम्ही जाहीर केला आहे. त्यामुळे तो द्यावाच लागणार आहे. न देता पाताळात जरी जावून बसलात तरी शोधून तुम्हाला द्यायला भाग पाडणार आहे.
भगवान काटे म्हणाले, उसाची कोंडी ही सोन्याची कांडी आहे हे सांगण्याचे काम संघटनेने केले आहे. संघटना पहिल्यांदा सावध करते, नाही तर बुडका हातात घेते. त्यामुळे दर निकालात निघल्याशिवाय कारखाने चालू करू नका.
प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात शेतकºयांच्या उसाचे थकीत पैसे मिळावेत व चालू हंगामातील एफआरपी ठरविण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच राजू पाटील, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. २७ तारखेला जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेस प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी बाळाराम फडके, राजू व्हटकर, बी. डी. पाटील, सतीश सबनीस, मारूती मेणसे, अरूण पाटील, सुस्मिता पाटील, टी. जी. पाटील, निगाप्पा मलखांबकर, सुरेश कुट्रे उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
हुमणी म्हणजे काय..?
खासदार शेट्टी यांनी एका शेतकºयाने राज्याच्या प्रभारी कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे उसावर हुमणी पडल्याने काय तरी मदत करा, अशी मागणी केली. त्यावर कृषीमंत्र्यांनी हुमणी म्हणजे काय, असा सवाल केला. अख्ख्या महाराष्ट्रात हुमणीने धुमाकूळ घातला असताना कृषीमंत्र्यांना हुमणी म्हणजे काय, हे माहीत नाही, मग हे शेतीची धोरणे कसे ठरविणार, असा सवालही शेट्टींनी यावेळी केला.

Web Title: Farmers will show strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.