शेतकरी, कामगारांचा गुरुवारी चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:54 PM2020-11-21T17:54:29+5:302020-11-21T17:55:19+5:30
farmar, kolhapurnews केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील शेतकरी, कामगार गुरुवारी (दि. २६) देशव्यापी संप करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही शंभर टक्के चक्का जाम आंदोलन होणार आहे. शनिवारी शेकाप कार्यालयात झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
कोल्हापूर : केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील शेतकरी, कामगार गुरुवारी (दि. २६) देशव्यापी संप करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही शंभर टक्के चक्का जाम आंदोलन होणार आहे. शनिवारी शेकाप कार्यालयात झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
मोदी सरकारने बड्या उद्योगपतींचे भले करण्यासाठी देशातील शेतकरी आणि कामगारांना त्यांच्या दावणीला बांधण्यासाठी कायद्यांमध्ये बदल केला आहे. वाढीव वीज बिले, महागाई यांवरून देशभरातील सर्व डाव्या संघटना, शेतकरी संघटनांसह बँक, एलआयसी, रेल्वे, वीज संघटनांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्याचे ठरवले.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी शनिवारी बैठक झाली. नामदेवराव गावडे, चंद्रकांत यादव, गिरीश फोंडे, बाबासो देवकर, बाबूराव कदम, अतुल दिघे, जालंदर पाटील, संभाजीराव जगदाळे, वसंत डावरे, सतीशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, जनार्दन पाटील, रवी जाधव, अमोल नाईक यांच्या प्रुमख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी संघटना, कामगार कृती समिती, कंत्राटी शिक्षक, बँक, युवक, आशा, अंगणावाडीसह सर्व संघटनाचे कर्मचारी उपस्थित होते.
असे असणार आंदोलन
- प्रत्येक तालुक्यात तहसिल कायार्लयासमोर निदर्शने होणार
- सकाळी १० वाजता बिंदू चौक़ातून मोटारसायकल रॅली
- कोल्हापुरातील सर्व मार्गांची नाकाबंदी
- राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्ह्यातील मार्गही रोखणार