यशवंत बँकेकडून फास्टॅग सेवा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:08+5:302020-12-30T04:32:08+5:30
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक नागरिकांसाठी ही महत्त्वाची सेवा असून रोख पैशाचा व्यवहार न करता टोल ...
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारक नागरिकांसाठी ही महत्त्वाची सेवा असून रोख पैशाचा व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल. प्रचलित पद्धतीने टोल भरता येत असला तरी शासनाच्या नवीन नियमानुसार टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य असून फास्टॅग असणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावर थांबावे लागणार नाही. टोलची रक्कम फास्टॅगशी जोडलेल्या बँक अकाऊंटमधून कपात होईल तरी बँक ग्राहकांनी बँकेशी संपर्क साधावा व फास्टॅग सेवेचा वापर करावा.
आजच्या आधुनिक युगात बँक ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा पुरविण्यात बँकेचे एक पाऊल पुढे आहे. येत्या काही कालावधीमध्ये बँकेचा ग्राहकांना मोबाईल बँकिंग तसेच यूपीआय, (फोन पे, गुगल पे ) ई-सेवा देण्याचा मानस आहे. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.