रूकडी येथे रुग्णालय जागेसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:26+5:302021-07-15T04:18:26+5:30

राजर्षी शाहू महाराज यांनी रूकडी येथील जवळपास दीडशे एकर जमीन रयत शिक्षण संस्थेस दिले होते. या जागेपैकी पंधरा ते ...

Fasting for hospital space at Rukdi | रूकडी येथे रुग्णालय जागेसाठी उपोषण

रूकडी येथे रुग्णालय जागेसाठी उपोषण

Next

राजर्षी शाहू महाराज यांनी रूकडी येथील जवळपास दीडशे एकर जमीन रयत शिक्षण संस्थेस दिले होते. या जागेपैकी पंधरा ते वीस एकर जमिनीवर प्रशाला असून उर्वरित जागा संस्था शेतीसाठी कसत आहे.

रूकडी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे; पण त्याकरिता जागा नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचे मंजूर प्रस्ताव पडून आहे. यासाठी रयत शिक्षण संस्थेने सहा एकर जमीन रुग्णालयास द्यावे यासाठी रूकडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमित भोसले व कृती समितीने रयत शिक्षण संस्थेकडे ४ डिसेंबर २०१७, ११ डिसेंबर २०१७ व १५ जून २०२१ रोजी निवेदन व उपोषणाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. पण रयत शिक्षण संस्थेने आजपर्यंत कोणतेच हालचाल केले नसल्याने सदरची जागा रुग्णालयासाठी मिळावे यासाठी आजपासून उपोषणास सुरुवात होत आहे.

दरम्यान रयत शिक्षण संस्थेने रूकडी ग्रामीण रुग्णालयास जागा द्यावी, यासाठी हालोंडी, हेरले, माले, अतिग्रे, मुडशिंगी, माणगाव, साजणी, तिळवणी येथील ग्रामपंचायतीने ठराव करून यास अनुमती दिल्याची माहिती अमितकुमार भोसले यांनी दिले आहे.

Web Title: Fasting for hospital space at Rukdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.