कुरुंदवाड पालिका चौकात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:17 AM2020-12-07T04:17:59+5:302020-12-07T04:17:59+5:30
कुरुंदवाड : केंद्र शासनाने शेतकरीविरोधी केलेले कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ...
कुरुंदवाड : केंद्र शासनाने शेतकरीविरोधी केलेले कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक दीपक पोमाजे यांच्या नेतृत्वाखाली येथील पालिका चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणांनी पालिका चौक दणाणून गेला.
यावेळी राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ, दिपक पोमाजे, सामाजिक कार्यकर्ते जय कडाळे, रघू नाईक, तानाजी आलासे, आण्णासो चौगुले, जयपाल बलवान, सुनील कुरुंदवाडे, आदींनी केंद्र सरकारच्या शेतकरी उद्ध्वस्त करणारे कृषी विधेयकाच्या विरोधात आक्रमक भाषण करीत ८ तारखेचा देशव्यापी बंद यशस्वी करण्याचा निर्णय घेतला.
आंदोलनात नगरसेवक बापू जोंग, दीपक परीट, ममतेश आवळे, प्राचार्य टी. के. जाधव, सुरेश बिंदगे, प्रवीण खबाले, राजेंद्र पोमाजे, राजगोंडा पाटील, देवल बंडगर, आण्णासाहेब उगारे, सतीश माने, मुकुंद सावगावे, आब्बास पाथरवट, जे. पी. जाधव, एन. डी. पाटील, दीपक कांबळे, दत्तात्रय गुरव यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो - ०६१२२०२०-जेएवाय-०५
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.