परभणीतील शेतकऱ्यांचे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:47 PM2018-10-03T17:47:17+5:302018-10-03T17:49:33+5:30
परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले.
कोल्हापूर : परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले. नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत दारातून उठणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबत बुधवारी (दि. १०) बैठक घेण्याचे मंत्रालयातून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर ठिय्या उठविला.
अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी बुधवारी दुपारी एक वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंदोलनकर्ते व मंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्याशी चर्चा घडवून आणली. यादव यांनी मंत्री पाटील व कृषी सचिवांशी संपर्क साधला. त्यानंतर आंदोलकांबरोबर बुधवारी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन कृषी मंत्रालयातून आल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन स्थगित केले. दीपक किपने, उद्धव पोळ, रामकृष्ण रोटे, भीमराव मोगले, अशोक साखरे, बाळासाहेब जमरे, राजेभाऊ राठोड, सोपान जोखर, बंडू आव्हाड, उमाजी घुमरे, बळिराव शिंदे, रामराव गव्हाणे, आदी शेतकरी सहभागी झाले होते.
विलास बाबर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामामध्ये ७० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात ४३ टक्के आणेवारी आली असताना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाशी संगनमत करून परभणी, जिंतूर, पूर्णा तालुक्यांतील मळणी व कापणीचे प्रयोग करताना शेतकºयांना अंधारात ठेवून चुकीचे उत्पन्न दाखविले. या प्रयोगावर पंच, संबंधित शेतकरी, प्रयोग करणाºया कर्मचाºयांच्या स'ा नाहीत. एकाच हस्ताक्षरात पंचनामे केले असून त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली. पाथरी, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम तालुक्यातील चौदा मंडळांतील उत्पन्न ३० टक्केदेखील आलेले नाही. येथील शेतकºयांनाही रास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत शेतकºयांनी उपोषण केले. नागपूर अधिवेशन काळात कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी सचिव विजयकुमार यांच्याशी बैठक झाली. यामध्ये भरपाई देण्याचे आश्वासन दिले; पण त्याची पूर्तता झाली नाही. त्यानंतर ५ सप्टेंबरला पुन्हा शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. पुन्हा आश्वासन दिले; पण पदरात काहीच नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी हा निर्णय घेतला. आता पुन्हा बुधवारच्या बैठकीचे आश्वासन दिले आहे; पण नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा बाबर यांनी दिला.
पोलिसांचे दातृत्व
शेतकरी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परभणी जिल्'ातील खेड्यापाड्यांतून कोल्हापूरकडे निघाले होते. दुपारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना नाष्टा-पाणी दिले.