पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी, नातवावर जीवघेणा हल्ला; कोल्हापुरातील इचलकरंजी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 12:18 PM2023-06-19T12:18:23+5:302023-06-19T12:44:30+5:30

पोलिस ठाण्यासमोरच काही अंतरावर या दोघांना गाठून संशयितांनी हल्ला केला

Fatal attack on grandmother, granddaughter who came to file a complaint at the police station; Incident at Ichalkaranjit in Kolhapur | पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी, नातवावर जीवघेणा हल्ला; कोल्हापुरातील इचलकरंजी येथील घटना

पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी, नातवावर जीवघेणा हल्ला; कोल्हापुरातील इचलकरंजी येथील घटना

googlenewsNext

इचलकरंजी : येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आजी व नातवावर चौघांनी कोयता हल्ला केला. अभिषेक बजरंग खांडेकर (वय २१, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) व विमल प्रकाश पाटील (६५, रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चौघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रावसाहेब गोसावी, उमाजी गोसावी, अजय दुवे व एक अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. यातील अभिषेक व विमल या नातू व आजीला रावसाहेब याने मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी हे दोघे शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे येत होते.

पोलिस ठाण्यासमोरच काही अंतरावर या दोघांना गाठून संशयितांनी हल्ला केला. कोयता, कटर आणि ब्लेडने वार करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यासमोरच मोठी गर्दी जमली होती.

Web Title: Fatal attack on grandmother, granddaughter who came to file a complaint at the police station; Incident at Ichalkaranjit in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.