वीस नगरसेवकांचे भवितव्य ‘नगरविकास’कडे

By Admin | Published: May 3, 2016 12:26 AM2016-05-03T00:26:19+5:302016-05-03T00:45:31+5:30

जात वैधता प्रमाणपत्राचे त्रांगडे : महापालिकेकडून विभागाला ५५ पानी वस्तुनिष्ठ अहवाल सादर

The fate of twenty corporators is 'Urban development' | वीस नगरसेवकांचे भवितव्य ‘नगरविकास’कडे

वीस नगरसेवकांचे भवितव्य ‘नगरविकास’कडे

googlenewsNext

वीस नगरसेवकांचे भवितव्य ‘नगरविकास’कडे
जात वैधता प्रमाणपत्राचे त्रांगडे : महापालिकेकडून विभागाला ५५ पानी वस्तुनिष्ठ अहवाल सादर
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नोव्हेंबर २०१५मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून विजयी झालेल्या २० नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचा सुमारे ५५ पानांचा वस्तुनिष्ठ अहवाल सोमवारी महानगरपालिका प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवला.
जातपडताळणी समितीकडे या संदर्भात आपल्याकडे कार्यवाही सुरू असल्याबाबतचे नगरससेवकांना दिलेल्या पत्रांच्याही प्रती या अहवालासोबत जोडल्या आहेत. मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता न आल्याने संबंधित २० नगरसेवकांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. या नगरसेवकांबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती महापालिकेने नगरविकास विभागाकडे केले आहे. त्यामुळे आता कारवाईचा चेंडू नगर विकास विभागाच्या कक्षेत गेला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांना पुढील सहा महिन्यांत म्हणजे ३० एप्रिल २०१६ पर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होेते. त्याबाबतचे हमीपत्र संबंधित नगरसेवकांनी निवडणूक लढविताना उमेदवारी अर्जासोबत जोडले आहे. यापूर्वी ५ नगरसेवकांनी आपले जात वैधता प्रमाणापत्र समितीकडून घेऊन सादर केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून २८ नगरसेवकांच्या अर्जानुसार जातपडताळणी समितीकडून सुनावणी सुरूहोती. चार दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आठ नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले ते त्यांनी मुदतीत महापालिका प्रशासनाकडे सादर केले पण २० नगरसेवकांचा शनिवारपर्यंत अंतिम मुदतीपर्यंत अंतिम निर्णय न झाल्याने हे प्रमाणपत्र हाती मिळाले नसल्याने ते त्यांना सादर करता आले नाही.
पण संबंधित नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांबाबत विभागीय जातपडताळणी समितीकडे कार्यवाही अद्याप सुरू असल्याचे पत्र समितीच्या उपायुक्त तथा सदस्य सचिव चव्हाण यांनी दिलेले हे पत्र सर्व नगरसेवकांनी महानगरपालिकेस सादर केले.
२८ मार्च २०१६ रोजी शासनाने परिपत्रक काढून सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या नगरसेवकांबाबत अहवाल पाठवावा, असे निर्देश कोल्हापूर महानगरपालिकेस दिले होते. त्यानुसार शनिवारी हे जात वैधता प्रमाणापत्र सादर करण्याची अंतिम मुदत संपल्याने सोमवारी या २० नगरसेवकांनी मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नसल्याबाबतचा वस्तुनिष्ठ ५५ पानी अहवाल महापालिका प्रशासनाने राज्य नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवून कार्यवाही करण्याची विंंनंती केली.

जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले नगरसेवक
महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम यांच्यासह सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, नीलेश देसाई, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसीना फरास, सचिन पाटील, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार, नियाज खान या नगरसेवकांचा जात प्रमाणपत्र सादर न केलेल्यांमध्ये समावेश आहे.


कारभाऱ्यांची घालमेल
सुमारे २० नगरसेवकांचे पद धोक्यात आल्याने या संबंधित नगरसेवकांसह सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांची घालमेल सुरू झाली आहे.
सोमवारी दिवसभरात दोनवेळा या कारभारी नेत्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन कारवाई न करण्याबाबत चर्चा केली.

Web Title: The fate of twenty corporators is 'Urban development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.