शेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:18 PM2020-05-07T17:18:51+5:302020-05-07T17:19:34+5:30

शेतीच्या कारणांवरून करवीर तालुक्यातील महेपैकी जरगवाडीत पाचजणांनी पिता-पुत्रास मारहाण केली. यामध्ये बंडू आकाराम पाटील (६५ रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Father and son beaten for agricultural reasons | शेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाण

शेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाण

Next
ठळक मुद्देशेती कारणावरून पिता-पुत्रास मारहाणमहेपैकी जरगवाडीत प्रकार : पाच जणांवर गुन्हा

कोल्हापूर : शेतीच्या कारणांवरून करवीर तालुक्यातील महेपैकी जरगवाडीत पाचजणांनी पिता-पुत्रास मारहाण केली. यामध्ये बंडू आकाराम पाटील (६५ रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बंडू पाटील यांनी आपल्या शेतात गाजरगवत लावले होते. ते गाजरगवत विलास धोंडिराम वाईंगडे यांनी उपटून टाकले. याप्रकरणी संतप्त झालेले पाटील यांनी त्यांना जाब विचारला. यावरुन दोघांत भांडण झाले.

या भांडणातच विलास वाईंगडे याच्यासह पाचजणांनी पाटील व त्यांच्या मुलाला खोरे, टिकाव, कुऱ्हाडीचे दांडके मारून जखमी केले. त्यामध्ये बंडू पाटील हे जखमी झाले. याप्रकरणी विलास धोंडिराम वाईंगडे, अरुण वाईंगडे, सचिन वाईंगडे, संग्राम वाईंगडे, ओंकार वाईंगडे (सर्व रा. महे, ता. करवीर) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
 

Web Title: Father and son beaten for agricultural reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.