कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना पितृशोक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:03 PM2018-12-04T18:03:52+5:302018-12-04T18:05:14+5:30
नारायणराव नांगरे पाटील यांचे मूळ गाव कोकरुड असून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात आहे.
कोल्हापूर - सिंघम अधिकारी म्हणून महाराष्ट्राला परिचीत असलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. नारायणराव नांगरे पाटील असे त्यांच्या वडिलांचे नाव असून वयाच्या 79 व्या वर्षी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कोल्हापूरसह शिराळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नारायणराव नांगरे पाटील यांचे मूळ गाव कोकरुड असून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात हे गाव आहे. आपल्या कारकिर्दीत नारायणराव यांनी कोकरुड गावचे सरपंच ते शिराळा पंचायत समितीचे सभापती अशी विविध राजकीय पद भूषवली आहेत. तसेच जुन्या पीढीतील प्रसिद्ध पैलवान अशीही त्यांची ओळख होती. औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक पद्माकरराव मुळे यांचे ते व्याही होते. कोकरुड या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांच्यावर वडिलांच्या व्यक्तीमत्वाचा खूप प्रभाव होता.