मुलीच्या खूनप्रकरणी बापास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:52+5:302021-08-26T04:27:52+5:30

हुपरी: यळगूड(ता. हातकणंगले) येथील प्रणाली युवराज साळुंखे (वय ९)या निष्पाप मुलीला पंचगंगा नदीत ढकलून देऊन तिचा जीव घेणाऱ्या युवराज ...

Father remanded in police custody for daughter's murder | मुलीच्या खूनप्रकरणी बापास पोलीस कोठडी

मुलीच्या खूनप्रकरणी बापास पोलीस कोठडी

Next

हुपरी: यळगूड(ता. हातकणंगले) येथील प्रणाली युवराज साळुंखे (वय ९)या निष्पाप मुलीला पंचगंगा नदीत ढकलून देऊन तिचा जीव घेणाऱ्या युवराज आत्माराम साळुंखे (वय ४०) याला आज न्यायालयासमोर उभे केले असता त्याला सहा दिवसांची(३० ऑगस्ट)पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान संशयित आरोपी युवराज याच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त अद्यापही ठेवण्यात आला आहे.

याबाबत पोलिसातुन समजलेली माहिती अशी,दुर्दैवी प्रणाली ही संशयित आरोपी युवराज याची सावत्र मुलगी होती. तिचा सांभाळ करण्याच्या अटीवर प्रणालीची आई अश्विनी हिने युवराज याच्यासोबत दोन वर्षापूर्वी विवाह केला होता. मात्र विवाहानंतर प्रणालीचा सांभाळ करण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होत असत.त्यामुळे युवराजने प्रणालीला बाजूला करण्याचा निर्धार केला होता.तो गेल्या अनेक दिवसांपासून त्यासाठी फक्त संधीच्या प्रत्यक्षात होता. रविवारी संध्याकाळी ही संधी चालून येताच युवराजने प्रणालीचे अपहरण करून तिला इचलकरंजीनजीक पंचगंगा नदीत ढकलून देऊन तिचा जीव घेतला.त्यानंतर त्याने हुपरी पोलिसांत प्रणाली हरवली असल्याची फिर्याद नोंद करीत इतरांसोबत शोधाशोध करण्यामध्ये सहभाग घेतला. कांही घडलेच नाही असे भासवत तो पोलिसांच्यासोबत अगदी बिनधास्तपणे वावरू लागला होता.तरीही त्याच्या कांही संशयास्पद हालचालीवरून पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन आपल्या परीने तपासास सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने प्रणालीला नदीत ढकलून दिल्याची कबुली दिली होती. मंगळवारी सकाळी प्रणालीचा मृतदेह सापडताच युवराजला अटक केली होती. त्याला आज न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवसांची(३०ऑगस्ट)पोलीस कोठडी देण्यात आली.

Web Title: Father remanded in police custody for daughter's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.