कोल्हापुरात रेल्वे दक्षता पथकाच्या छाप्याचा फज्जा एजंट गायब : सामान्य नागरिक वेठीस
By admin | Published: May 10, 2014 11:51 PM2014-05-10T23:51:39+5:302014-05-10T23:51:39+5:30
मिरज : अवैध रेल्वे तिकीट एजंटांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर छापे टाकून तपासणी केली.
मिरज : अवैध रेल्वे तिकीट एजंटांना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर छापे टाकून तपासणी केली. मात्र पथकाच्या हाती एकही तिकीट एजंट सापडला नाही. पथकाने एजंट असल्याच्या संशयावरून ताब्यात घेऊन चौकशी केल्याने सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विषेश पथकाच्या या कारवाईबाबत स्थानिक रेल्वे सुरक्षा दल अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. पथकाने काही ट्रॅव्हल्स एजन्सीच्या कार्यालयांचीही तपासणी केल्याची माहिती मिळाली. मात्र याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. सुटीचा हंगाम सुरू असल्याने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या तिकीट एजंटांना रोखण्यासाठी पुण्याच्या पथकाने कोल्हापूर रेल्वेस्थानकात तपासणी केली. वरिष्ठ निरीक्षक जुबेर खान यांच्यासह पथकाने रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी आलेल्या दहा प्रवाशांना ताब्यात घेतले. तब्बल चार तास या नागरिकांची चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीअंती ते सर्व प्रवासी असल्याने आढळून आले. पथकाच्या हाती एकही एजंट सापडला नाही. मात्र सामान्य नागरिकांना पथकाच्या कारवाईचा त्रास सहन करावा लागला. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणार्या शासकीय कर्मचार्यांनाही पथकाच्या या कारवाईचा फटका बसला. कोणीही एजंट सापडला नाही, मात्र सामान्य प्रवाशांना त्रास झाल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाच्या छाप्याचा फज्जा उडाला. (वार्ताहर)