वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती

By admin | Published: August 13, 2015 12:12 AM2015-08-13T00:12:25+5:302015-08-13T00:12:25+5:30

सायझिंग संपाबाबत समन्वयाची गरज : लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता

The fear of stumbling in the economy of textiles | वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती

वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती

Next

घन:शाम कुंभार- यड्राव -सायझिंग कामगारांच्या बेमुदत संपामुळे वस्त्रनगरीचे अर्थचक्र मंदगतीने सुरू आहे. त्यावर अवलंबून असलेल्या यंत्रमागधारकांसह सर्व घटक हवालदिल झाले आहेत. याबाबत समन्वयाने लवकर तोडगा काढण्यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
सुधारित किमान वेतन अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी संपाचे हत्यार उचलले आहे. याकडे सायझिंग मालकांनी पाठ फिरवली आहे. या संपामुळे वीस-बावीस दिवसांपासून यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे मिळणे बंद होत आले असल्याने यंत्रमाग कारखाने बिमाअभावी बंद आहेत. त्याचा विपरित परिणाम यंत्रमाग कामगारांसह इतर अवलंबून असणाऱ्या घटकांवर होत आहे.सायझिंग कामगार किमान वेतनाबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयामध्ये जो निर्णय होईल तो सर्वमान्य असेल. परंतु सद्य:स्थितीत सायझिंगची चाके फिरल्यास वस्त्रोद्योगास गती मिळू शकते, अशी भावना यंत्रमागधारकांमध्ये आहे. यंत्रमाग कारखाने बिमांअभावी बंद आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेले यंत्रमागधारक पुन्हा आर्थिक अडचणीत ढकलला जात आहे. यंत्रमाग बंद असल्याने परप्रांतीय कामगारांना आपापल्या प्रांताकडे जाण्याचे वेध लागले आहेत. तर स्थानिक कामगारांना उचल देऊन त्यांना सांभाळण्याची जबाबदारी यंत्रमागधारकांवर आली आहे.
सण, उत्सव समोर आल्यामुळे परप्रांतीय कामगार आपल्या भागाकडे गेल्यास तो सर्व सण, उत्सव, दीपावली करून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कामगारांअभावी यंत्रमाग व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे यंत्रमागधारकांवरील आर्थिक बोजा वाढत जाणार आहे.
इचलकरंजीतील उत्पादित होणारे केंब्रिक, पॉपलीन, मलमल, आदी कापड या संपामुळे बंद राहिल्यास त्याचा व्यापार भिवंडी, मालेगाव, राजस्थान, पाली आदीकडे जाऊ शकतो. हे संभाव्य धोके हा संप लांबल्यास निर्माण होऊ शकतात. यामुळे या संपात सायझिंग मालक व कामगार यांच्यामध्ये समन्वय होणे आवश्यक आहे.
कारण सायझिंग म्हणजे वस्त्रोद्योगाचे उगमस्थान आहे. सायझिंग सुरू राहिल्यास वस्त्रोद्योगास पूरक ठरते, यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती निर्माण झाली आहे.
..

इचलकरंजी वगळता मागणी नाही
वस्त्रोद्योग महाराष्ट्रामधील मालेगाव, भिवंडी, विटा, सोलापूर, माधवनगर या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. तेथील सायझिंग व यंत्रमाग व्यवसाय विनातक्रार सुरू आहेत. सायझिंग किमान वेतनासाठी इचलकरंजी वगळता कोठेही मागणी नसल्याची चर्चा यंत्रमागधारकांत आहे. इचलकरंजी शहरालगत असलेले यड्राव, तारदाळ, खोतवाडी, पार्वती औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सुमारे सहाशे यंत्रमाग कारखाने असून, वीस हजार यंत्रमाग आहेत.

Web Title: The fear of stumbling in the economy of textiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.