फीअभावी विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:36+5:302021-06-06T04:17:36+5:30

कोल्हापूर : फीअभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जाणार नाही, अशी ग्वाही शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे ...

Fee-less student results will not be retained | फीअभावी विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जाणार नाही

फीअभावी विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जाणार नाही

Next

कोल्हापूर : फीअभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जाणार नाही, अशी ग्वाही शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनवणे यांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिली. फीच्या संदर्भात येत्या १४ जूनला संस्थाचालकांची बैठक बोलावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मनमानी फी आकारणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या पीटीए समितीवर शासन प्रतिनिधी नियुक्तीसाठी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

लॉकडाऊनकाळात शाळा बंद असतानाही ऑनलाइन शिक्षण दिले असल्याचे सांगत फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांची आता संस्थाचालकांकडून निकाल राखून ठेवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जाऊन जाब विचारला. पालकांची फसवणुक, लूट होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची असतानादेखील केवळ या खासगी शाळांच्या समित्यांवर संस्थाचालकांचेच प्रतिनिधी असल्याने मनमानी कारभारात वाढ होत आहे. याकडे लक्ष केंद्रित करताना सरकारचा प्रतिनिधी नेमण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

शिक्षण उपसंचालक सोनवणे यांनी पुढील काळातील प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा, शासनाच्या निर्देशानुसार फी आकारणी आदींकरिता सर्व शिक्षण संस्थांची बैठक बोलावण्यात आली असल्याचे सांगून, चालू शैक्षणिक वर्षात कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली. या वेळी एस. एस. सी. बोर्डचे कुणाल देविदास, प्रा. आय. जी. शेख, सहा. शिक्षण संचालक सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षणाधिकारी श्रीमती पूनम गुरव, शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार, प्रशासन अधिकारी एस. के. यादव, युवासेना जिल्हा समन्वयक योगेश चौगले, शहर अधिकारी अ‍ॅड. चेतन शिंदे, शहर अधिकारी पीयुष चव्हाण, शिवसेना विभागप्रमुख कपिल सरनाईक, युवासेना शहर समन्वयक शैलेश साळोखे, दादू शिंदे, आयटी सेना शहर अधिकारी सौरभ कुलकर्णी, शुभम शिंदे आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : ०५०६२०२१-कोल- शिक्षण

फोटो ओळ : खासगी शाळांच्या मनमानीविरोधात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी शिक्षण उपसंचालक एस. डी. सोनावणे यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली.

Web Title: Fee-less student results will not be retained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.