कोल्हापूर : मालवाहतूकदार संघटनांतर्फे खासदार धनंजय महाडिक यांंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:45 AM2018-07-30T11:45:04+5:302018-07-30T11:46:44+5:30
मालवाहतूकदारांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनप्रश्नी लोकसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर विवेचन केल्याबद्दल व सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याबद्दल त्यांचा कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मालवाहतूकदार संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर : मालवाहतूकदारांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनप्रश्नी लोकसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर विवेचन केल्याबद्दल व सभापती सुमित्रा महाजन यांच्यासह संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. याबद्दल त्यांचा कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मालवाहतूकदार संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
खासदार महाडिक यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर शुक्रवारी (दि. २७) केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांच्याशी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तर उर्वरित मागण्या लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासनही वित्तमंत्री गोयल यांनी दिले.
याबद्दल कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह कोल्हापूर बॉक्साईट वाहतूक संघटना, जिल्हा वाळू संघटना, नेर्ली तामगाव डंपर वाहतूक संस्था, कोल्हापूर लोकल माल वाहतूक संघटनांतर्फे महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विजय भोसले, विजय पोवार, गोविंद पाटील, श्रीरंग पाटील, अश्विन पटेल, प्रकाश भोसले, अतुल जाधव, जयराम जाधव, प्रकाश सुरवसे, संतोष पोवार, विजय पाटील, विजय तेरदाळकर, तानाजी गोंधळेकर, सुनील राठोड, कुलभूषण कोळी, विजय कडवेकर, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनसह विविध मालवाहतूकदार संघटनांतर्फे खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुभाष जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.