प्रशासकीय यंत्रणेमुळेच स्त्री भ्रूणहत्या
By admin | Published: March 13, 2017 11:02 PM2017-03-13T23:02:39+5:302017-03-13T23:02:39+5:30
माधुरी देशमुख : ‘म्हैसाळ’ची तक्रार होऊनही बोगस अहवाल
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याने केलेल्या स्त्री भ्रूणहत्येबद्दल प्रशासकीय यंत्रणेकडे तक्रारी केल्या होत्या. तरीही चौकशी समितीने बोगस अहवाल देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हत्यांकाडाला शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप प्रा. माधुरी देशमुख यांनी केला. दोषींवर त्वरित कडक कारवाई केली पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केली.
स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियातर्फे शुक्रवारी सांगलीत निर्धार परिषद झाली. या परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. देशमुख बोलत होत्या. प्रा. नितीन पाटील परिषदेचे अध्यक्ष होते. प्रा. देशमुख म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कायदे केले आहेत. पण, त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा किडल्यामुळे कारवाई होत नाही. म्हैसाळ प्रकरणातही शासकीय वैद्यकीय यंत्रणेच्या चुकीमुळेच डॉ. खिद्रापुरे गैरव्यवसाय करीत होता. यावेळी उमेश देशमुख, योगेश नाडकर्णी, करूणा खोचे, ममता पाटील, सचिन खंबाळे, नीलेश शेंडगे, अमृता दौंडे, तुळशीराम गळवे, \कुलदीप बेडगे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)