धरणे भरण्यास सप्टेंबर उजाडणार

By admin | Published: August 9, 2015 11:56 PM2015-08-09T23:56:58+5:302015-08-09T23:56:58+5:30

प्रमुख जलाशये रिकामीच : गतवर्षीच्या तुलनेत ७५ टक्केच पाणीसाठा

The fencing will start in September | धरणे भरण्यास सप्टेंबर उजाडणार

धरणे भरण्यास सप्टेंबर उजाडणार

Next

राजाराम लोंढे - कोल्हापूर -यंदा जिल्ह्यात उघडझाप पाऊस असल्याने पिकांना फारसा धोका बसला नाही. मात्र, धरणात अजून तरी अपेक्षित पाणीसाठा नाही. गत तीन वर्षांच्या तुलनेत राधानगरी, तुळशी, वारणा व दूधगंगा या प्रमुख धरणातील पाणीसाठा ७५ टक्केच आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरणारे घटप्रभा धरण भरण्यास यंदा आॅगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली. पावसाची अनिश्चितता पाहता मोठे व मध्यम बारा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास सप्टेंबर उजाडण्याची शक्यता आहे.
आॅगस्ट निम्मा झाला. नद्यांना साधा पूरही आलेला नाही. पावसाची प्रमुख नक्षत्रे संपल्याने आता हक्काचा पाऊस संपला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस असणाऱ्या गगनबावडा तालुक्यात ५ हजार मिलीमीटर पाऊस होतो. तिथे अडीच महिन्यांत कशीतरी २ हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मोठे व मध्यम प्रकल्प बारा आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस कमी असल्याने प्रमुख धरणे अजूनही रितीच आहेत. मागील तीन वर्षांचा आढावा घेतला तर राधानगरी धरण जुलैअखेर पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी ८१ टक्क्यांवरच आहे. तीच अवस्था तुळशी, वारणा, दूधगंगा धरणांची आहे. गत तीन वर्षांच्या तुलनेत सर्वच धरणे ७५ टक्क्यांवर आहेत. त्यामुळे धरणे भरण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडेल, असा अंदाज आहे.

७ आॅगस्टला धरणातील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये
धरणाचे नाव२०१२२०१३२०१४२०१५
राधानगरी२३६.३२२३१.३८२३४.३५१७८.१६
तुळशी६६.६६९७.०९८५.२२५८.५१
वारणा८७७८६९.४२८९३.१९६७४.१३
दूधगंगा५५४.१६६२३.०९५९१.४०४१५.८०
कासारी७०.२८५७.६३७४.३९७०.७८
कडवी७१.२४७१.२४७१.२४६४.६९
कुंभी५८.४७६५.१८७०.१६५६.३८
पाटगाव८७.८२१०५.२४८७.९८७७.९८

वीजनिर्मितीवर परिणाम
दूधगंगा, राधानगरी धरणातून वीजनिर्मिती केली जाते. गत तीन वर्षांत धरणे भरण्यास आॅगस्ट उजाडत असला तरी जुलैपासूनच धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू होता. यंदा मात्र अनिश्चित पावसामुळे सुरुवातीपासूनच पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे.

Web Title: The fencing will start in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.