पुणे प्रवासावर सर्वाधिक प्रवाशांनी पाठ फिरविली खासगी बसेसह रेल्वे प्रवासावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 05:50 PM2020-03-13T17:50:20+5:302020-03-13T17:54:55+5:30

या बसेसमधून जाणाºया प्रवाशांची संख्या रोडावली आहे. शुक्रवारी दिवसभर रंगपंचमी आणि वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील गर्दीही रोडावली होती.

A few side effects on train travel with private buses | पुणे प्रवासावर सर्वाधिक प्रवाशांनी पाठ फिरविली खासगी बसेसह रेल्वे प्रवासावर परिणाम

पुणे प्रवासावर सर्वाधिक प्रवाशांनी पाठ फिरविली खासगी बसेसह रेल्वे प्रवासावर परिणाम

googlenewsNext
ठळक मुद्देवाढत्या कोरोना प्रसाराचा फटका 

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरातून मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली, बंगलोर, आदी ठिकाणी जाणाऱ्या खासगी बसेसवर मोठ्या, तर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर काही अंशी परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही रोडावली आहे.

मुंबई, पुणे, आदी ठिकाणी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे या ठिकाणी जाणा-या प्रवाशांच्या संख्येत गेल्या दोन दिवसांपासून घट होत आहे. याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी बसेसवरही झाला आहे. दिवसभरात ४५ खासगी बसेस मुंबई, पुणे या मार्गांवर कोल्हापुरातून धावतात. या बसेसमधून जाणाºया प्रवाशांची संख्या रोडावली आहे. शुक्रवारी दिवसभर रंगपंचमी आणि वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील गर्दीही रोडावली होती.

मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, आदी ठिकाणी कोल्हापुरातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या मार्गांवर प्रवास करणा-या काही अंशी प्रवाशांनी गेल्या दोन दिवसांपासून नियोजित दौरा रद्द करून आगाऊ आरक्षणही रद्द करण्यास सुरुवात केली आहे; तर कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सातारा, पुणे पॅसेंजर, कोयना एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री, महाराष्ट्र एक्सप्रेस, आदी रेल्वेगाड्यांना नियमित गर्दी आहे. विशेष म्हणजे काही कारणांमुळे २६ फेबु्रवारी ते १६ मार्च २०२० पर्यंत राणी चन्नमा एक्सप्रेस कोल्हापूर-मिरज येथून रद्द करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी नियमित पॅसेंजर रेल्वे गाड्यांना गर्दी होती; तर वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे लांब पल्ल्याचे आरक्षण केलेल्या प्रवाशांचे आॅनलाईनद्वारे आरक्षण रद्द करण्याचे प्रमाण वाढले आहे.

तिरूपतीला जाणा-यांची संख्या रोडावली
तिरूपती येथील व्यंकटपती बालाजी देवस्थानाला भेट देणाºया भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, कोरोनाच्या फैलावामुळे येथे जाणा-या भाविकांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे आरक्षण रद्द करणाºयांची संख्याही वाढली आहे. विशेषत: अनेक प्रवाशांनी आॅनलाईनद्वारे आपले आरक्षण रद्द केले आहे.
 

वाढत्या कोरोना विषाणूची भीती सर्वांमध्येच आहे. तरीसुद्धा रेल्वेची सेवा नियमितपणे सुरू आहे.
- ए. आय. फर्नांडिस, स्टेशन प्रबंधक, कोल्हापूर

 


खासगी बसेसमधून कोल्हापूरहून पुण्याला जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे.
- सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष, खासगी आरामबस चालक संघटना

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नेहमी गजबजणाºया कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शुक्रवारी शुकशुकाट होता.
 

Web Title: A few side effects on train travel with private buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.