झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 06:15 AM2018-01-12T06:15:33+5:302018-01-12T06:15:51+5:30

आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Fierce incidents in Kolhapur district, killing student from sleeping place | झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना

झोपण्याच्या जागेवरून विद्यार्थ्याला ठार मारले, कोल्हापूर जिल्ह्यातील भयंकर घटना

googlenewsNext

कोल्हापूर : आश्रमशाळेतील वसतिगृहात खिडकीजवळ झोपण्यावरून दोघा विद्यार्थ्यांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात एकाचा मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे बुधवारी रात्री हा प्रकार घडला. शंकर सावळाराम झोरे असे मृताचे नाव आहे. अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
महाविद्यालयाच्या आवारातच मुलांचे वसतिगृह आहे. आरोपी विद्यार्थी शंकरला खिडकीकडेला झोप, असे म्हणत होता परंतु तो तयार नव्हता. त्यातील वादानंतर झालेल्या हाणामारीत आरोपीने शंकरच्या छातीवर, पोटावर ठोसे लगावले. शंकर अत्यस्वस्थ झाला. इतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार अधीक्षक दत्तात्रय जाधव यांना सांगितला. जाधव यांनी जखमी
शंकरला तत्काळ दुचाकीवरून वडणगे
(ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयात नेले.
वसतिगृह अधीक्षक दत्तात्रय जाधव यांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याविषयी फिर्याद दिली आहे. शवविच्छेदनानंतर शंकरच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंबाईवाडा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यार्थी अस्वस्थ
खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरनी त्याला कोल्हापूरला सीपीआरमध्ये नेण्यास सांगितले. तेथे नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकाºयांनी शंकर मयत झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे वसतिगृहामध्ये खळबळ माजली आहे. तसेच सारेच विद्यार्थी अस्वस्थ व घाबरून गेल्याचे दिसत आहे.

Web Title: Fierce incidents in Kolhapur district, killing student from sleeping place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.