अंबाबाई देवस्थानसंदर्भात पंधरा दिवसात बैठक : रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:48 PM2017-08-10T18:48:28+5:302017-08-10T18:57:15+5:30

 Fifteen days meeting with Ambabai Devasthan: Ranjit Patil | अंबाबाई देवस्थानसंदर्भात पंधरा दिवसात बैठक : रणजीत पाटील

अंबाबाई देवस्थानसंदर्भात पंधरा दिवसात बैठक : रणजीत पाटील

Next
ठळक मुद्देराजेश क्षीरसागर यांनी मांडली लक्षवेधी सूचना शैक्षणिक अर्हता धारण करणारे पुजारी नेमण्याबाबत विचार सुरूदेवस्थानातील भ्रष्टाचाराबाबत सीआयडी चौकशी अंतिम टप्प्यात भक्तांना धमकीचे पत्र आल्याच्या पत्रावर कारवाई करणार

मुबंई, दि. १० : कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर देवस्थानबाबतीत स्थानिक लोकप्रतिनीधींशी पुढील पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

सदस्य राजेश क्षीरसागर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. डॉ. पाटील म्हणाले, अंबाबाईला पारंपारिक वस्त्राऐवजी घागरा-चोळीचा वेश परिधान करण्यात आल्याने भक्तांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. यासंदर्भात २५ जुलै २०१७ रोजी याबाबतीत कायदा करण्यासाठी राज्यशासनाने समीती गठीत केली. सहसचिव दजार्चा अधिकारी या समीतीचे अध्यक्ष आहेत. या समितीची बैठक देखील झाली आहे.


पंढरपूर व शिर्डी देवस्थानाच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात देखील वारसा हक्काने पुजारी नेमण्याऐवजी शैक्षणिक अर्हता धारण करणारे पुजारी नेमण्यात येण्याबाबत विचार सुरू आहे.


देवस्थानातील भ्रष्टाचाराबाबत सीआयडी चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. भक्तांना धमकीचे पत्र आल्याबाबत त्या पत्रावर कारवाई करण्यात येईल. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, चंद्रदिप नरके, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.

Web Title:  Fifteen days meeting with Ambabai Devasthan: Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.