वरणगे पाडळीत पंधरा घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:24 AM2021-07-28T04:24:16+5:302021-07-28T04:24:16+5:30
ओसरू लागला असला तरीही जाताना आपल्या विध्वंसाच्या खुणा मागे ठेवून जात आहे. पुरामुळे वरणगेमधील दहा, तर पाडळी गावातील ...
ओसरू लागला असला तरीही जाताना आपल्या विध्वंसाच्या खुणा मागे ठेवून जात आहे. पुरामुळे वरणगेमधील दहा, तर पाडळी गावातील पंधरा घरे पडली आहेत.
अनेक घरांना भेगा पडल्या आहेत; पण प्रशासनाकडून अजूनही पंचनामा करण्याचे
आदेश आलेले नाहीत. आंबेवाडी, प्रयाग
चिखलीबरोबरच वरणगे, पाडळी, निटवडे या गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. या गावांमधून साडेतीन हजार लोकांनी स्थलांतर केले आहे. पाडळी बुद्रुक
गावात 80 टक्के भागामध्ये महापुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे वरणगेतील
दोनशे, तर पाडळीतील 360 कुटुंबांनी स्थलांतर केले.
चौकट
आंबेवाडी येथे महापुराचे पाणी येथील वरणगे पाडळी गावचा रहिवासी
असणाऱ्या अमर शिंदे या होतकरू तरुणाच्या चॉकलेट व लोणच्याच्या गोडाऊनमध्ये
शिरल्याने त्याचे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. अमर शिंदे या तरुणाने एका
कंपनीची चॉकलेट व लोणचे एजन्सी घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. त्याचे आंबेवाडी येथे गोडाऊन आहे; पण या महापुराने त्याचे सर्वस्व हिरावून घेतले.