लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून हाणामारी, दोघे जण ताब्यात; कोल्हापुरातील लाइन बझारमध्ये तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:10 PM2023-02-20T12:10:16+5:302023-02-20T12:10:41+5:30

काही तरुणांनी पोलिसांच्या गाडीच्या दिशेने दगड फेकले; पण पोलिसांनी वेळीच त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Fight over children play, two arrested in Line Bazaar Kolhapur | लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून हाणामारी, दोघे जण ताब्यात; कोल्हापुरातील लाइन बझारमध्ये तणाव

छाया : दीपक जाधव

googlenewsNext

कोल्हापूर : कसबा बावडा येथील लाइन बझारमधील शहाजीनगर येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून मारामारी झाली. शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळासमोर रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहाजीनगर (लाइन बझार) येथे शिवजयंतीनिमित्त राजे ग्रुपच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी रात्री महिला आणि तरुणी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. या परिसरात राहणारी दोन लहान मुले मंडळासमोर मातीत खेळत होते. धूळ उडत असल्यामुळे महिलांनी त्यांना दुसरीकडे खेळण्यास सांगितले; पण त्या मुलांनी घरात जाऊन नातेवाइकांना हा प्रकार सांगितल्यानंतर दोन तरुणांनी येऊन मंडळातील काही महिला आणि तरुणींना मारहाण केली.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मारामारीची माहिती पोलिस घटनास्थळी पोहोचले. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या परिसरात शीघ्र कृती दलासह पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. शहर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते.

अधिकाऱ्यांनी परिस्थिती आणली नियंत्रणात

दरम्यान, दोन्ही संशयितांना अटक करावी आणि माफी मागण्यास सांगावे, असा आग्रह धरत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घातला. पोलिसांनी तातडीने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पोलिस गाडीत बसविले. गाडी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे जात असताना काही तरुणांनी गाडीच्या दिशेने दगड फेकले; पण पोलिसांनी वेळीच त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
 

Web Title: Fight over children play, two arrested in Line Bazaar Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.