राधानगरीत मतदानासाठी चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:18 AM2021-05-03T04:18:59+5:302021-05-03T04:18:59+5:30

राधानगरी : गोकुळ दूध संघासाठी राधानगरी तालुक्यात ९९.७८ टक्के मतदान झाले. एकूण ४५८ मतदारांपैकी ४५७ जणांनी मतदानाचा हक्क ...

Fight for votes in Radhanagar | राधानगरीत मतदानासाठी चढाओढ

राधानगरीत मतदानासाठी चढाओढ

Next

राधानगरी : गोकुळ दूध संघासाठी राधानगरी तालुक्यात ९९.७८ टक्के मतदान झाले. एकूण ४५८ मतदारांपैकी ४५७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १११ स्त्रिया व ३५६ पुरुष आहेत. सकाळी ८ पासून येथील राजश्री शाहू विद्या मंदिर येथील पाच व महाराणी राधाबाई कन्या शाळा येथील तीन अशा आठ मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले.

पहिल्या दोन तासांत तुरळक मतदान झाले. दुपारी बारापर्यंत तीस टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर एकाच वेळी मोठ्या संख्येने मतदार आले.

दोन वाजेपर्यंत बहुतांश मतदान झाले. चार वाजता ४५६ मतदान झाले. पुढच्या एका तासात एका मतदानाची नोंद झाली. ही सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.

सत्ताधारी गटाने शक्तिप्रदर्शनाला फाटा दिला. दुपारी बारापर्यंत झालेले बहुतांश मतदान या गटाचे होते. विरोधी आघाडीने सहलीवर नेलेल्या आपल्या मतदारांसह सर्वांना गैबी येथील कॉलेजवर एकत्र आणले. येथून सुमारे साडेतीनशेहून अधिक मतदारांना पाच खाजगी बस व अन्य वाहनांतून एकाच वेळी मतदानासाठी नेले. त्यामुळे मतदान केंद्राजवळ अंबाबाई मंदिर परिसरात झालेल्या गर्दीमुळे थोडा गोंधळ उडाला. पोलिसांनी येथून केवळ मतदारांना मतदान केंद्राच्या परिसरात सोडले. यानंतर मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या. दोन अडीच तास हे मतदान पूर्ण होण्यास लागले.

नेत्यांची घेतली भेट

विरोधी आघाडीने मतदार एकत्र केलेल्या ठिकाणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर यांनी भेट दिली. त्यानंतरच मतदारांना मतदानस्थळी नेण्यात आले.

..........

एकूण मतदान ४५८

झालेले मतदान ४५७

९९.७८ टक्के

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने दोन्ही मतदान केंद्रांच्या ठिकाणी पथक ठेवले होते. तेथे थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन तपासणी करूनच मतदारांना केंद्रात सोडले जात होते. कोरोनातून बरे झाल्यावर घरीच अलगीकरणात असलेल्या एका मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.

०२ राधानगरी

राधानगरी येथील मतदान केंद्रावर दुपारी १२ नंतर रांगा लागल्या. विरोधी गटाचे मतदार आल्यावर अशी गर्दी झाली.

Web Title: Fight for votes in Radhanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.