पेन्शनरांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:28+5:302020-12-07T04:19:28+5:30
निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समिती संलग्न जिल्हा पेन्शनर संघटनेची बैठक ‘श्रमिक’ महासंघाच्या संतराम पाटील सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी ...
निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समिती संलग्न जिल्हा पेन्शनर संघटनेची बैठक ‘श्रमिक’ महासंघाच्या संतराम पाटील सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी बिद्री साखर कामगार सभेचे नेते आनंदराव आबिटकर होते. पेन्शनर संघटनेचे सचिव ए. बी. पाटील यांनी आंदोलनाचा आढावा घेतला. मासिक तीन हजार रुपये आणि त्यास महागाई भत्ता जोडून पेन्शन मिळाली पाहिजे. पेन्शनवाढीचा निर्णय लवकर होऊन त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने त्वरित करावी, यासाठी सुरू असलेला लढा तीव्र करावा. प्रत्येक खासदारांना याकामी सहकार्य व्हावे, यासाठी निवेदन देण्यात यावे. कोरोनाचे संकट अजून गेले नसल्याने लेखी पत्रव्यवहार आणि निवेदनावर हा लढा सुरू ठेवत असल्याचे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे यांनी सांगितले. यावेळी संघटक सुभाष गुरव, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य शिवाजी देसावळे, शिवाजी सावंत, आदी उपस्थित होते. बी. एस. पाटील यांनी आभार मानले.
चौकट
लुबाडणूक करणाऱ्यांपासून सावध राहा
पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करतो असे कारण सांगून काही संघटनांचे कार्यकर्ते पैसा जमा करीत आहेत. अशा लुबाडणूक करणाऱ्यांपासून सावध रहा. या संसदीय अधिवेशनाच्या काळात दिल्लीत आंदोलनास परवानगी मिळाली नाही, तर स्थानिक पातळीवर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाणार असल्याचे राष्ट्रीय समन्वय समितीचे समन्वयक दिलीप पाटील यांनी सांगितले.
फोटो (०६१२२०२०-कोल- पेन्शनर सत्कार) : कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेच्या बैठकीत वारणा साखर कामगार संघाच्या कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल महादेव पाटील, मधुकर पोवार यांचा सत्कार आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेजारी शामराव मोरे, सुभाष गुरव, शिवाजी सावंत, ए. बी. पाटील, शिवाजी देसावळे, आदी उपस्थित होते.