फायटर्स स्पोर्टस्, भिडे स्पोर्टस् विजयी

By admin | Published: January 7, 2015 12:47 AM2015-01-07T00:47:57+5:302015-01-08T00:04:15+5:30

प्रत्युत्तरादाखल खेळताना फायटर्स क्लबने १७.१ षटकांत ३ गडी गमवून हे आव्हान पूर्ण केले.

Fighter Sports, Bhide Sports wins | फायटर्स स्पोर्टस्, भिडे स्पोर्टस् विजयी

फायटर्स स्पोर्टस्, भिडे स्पोर्टस् विजयी

Next

कोल्हापूर : शाहूपुरी जिमखाना येथे सुरू असलेल्या कै. प्रा. संजय देसाई टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज, मंगळवारी झालेल्या सामन्यात फायटर्स स्पोर्टस् व भिडे स्पोर्टस्ने विजय मिळवीत आगेकूच केली.
पहिला सामना शाहूपुरी जिमखाना विरुद्ध फायटर्स स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना शाहूपुरी जिमखाना संघाने २० षटकांत ५ बाद १४६ धावा केल्या. यामध्ये सिद्धार्थ कोठारीने नाबाद ४० धावा, राम कांबळे याने ३१, तर अवधूत पाटीलने २८ धावा केल्या. गोलंदाजी करताना फायटर्स स्पोर्टस् संघाकडून सुरेश शेट्टीने २ गडी बाद केले; तर रोहित मरळे व महेंद्र शिवशरण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फायटर्स क्लबने १७.१ षटकांत ३ गडी गमवून हे आव्हान पूर्ण केले. फायटर्सकडून फलंदाजी करताना रोहित मरळेने ४४, प्रशांत कोरेने नाबाद ३३ धावा, तर प्रणव आरमारकरने ३१ धावा केल्या. गोलंदाजी करताना शाहूपुरी जिमखाना संघाकडून साईल शिबेने ४, अवधूत पाटील, प्रशांत उगवीने प्रत्येकी एक गडी बाद केला. अशा प्रकारे फायटर्स क्लबने ७ गडी राखून विजय मिळविला.
दुसरा सामना भिडे स्पोर्टस् विरुद्ध सांगावकर स्पोर्टस यांच्यामध्ये झाला. भिडे स्पोर्टस्ने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमवून १३९ धावा केल्या. यामध्ये रजत खोपटे ४५ धावा, सचिन आर्दाळकरने ३० धावा केल्या. अनिल सांगावकर संघाकडून गोलंदाजी करताना प्रवीण पाटील, विनायक माने यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले, तर करण सांगावकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सांगावकर संघाने सर्वबाद ११३ धावांपर्यंतच मजल मारली. यामध्ये सांगावकर संघाकडून विश्वजित जगतापने २३, प्रथमेश दिवेकरने १९ धावा केल्या; तर गोलंदाजी करताना भिडे स्पोर्टस्कडून सौरभ शिंगारेने ३, महेश मस्के याने २, तर अमोल पवार व संपत पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. अशा प्रकारे भिडे स्पोर्टस्ने सामन्यात २६ धावांनी विजय मिळविला.

Web Title: Fighter Sports, Bhide Sports wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.