लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून देवकर पाणंदमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:39+5:302021-04-01T04:26:39+5:30
कोल्हापूर : लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून देवकर पाणंद येथे दोघांमध्ये मंगळवारी सायंकाळी हाणामारी आणि घरावर दगडफेकीचा प्रकार घडला. ...
कोल्हापूर : लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून देवकर पाणंद येथे दोघांमध्ये मंगळवारी सायंकाळी हाणामारी आणि घरावर दगडफेकीचा प्रकार घडला. त्याबाबत अतुल मुरलीधर भालकर (वय ३६, रा. शुश्रूषानगरी, देवकर पाणंद) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दीपक संभाजी कदम आणि राहुल संभाजी कदम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अतुल भालकर यांचे शुश्रूषानगरीमध्ये इस्त्रीचे दुकान आहे. त्यांच्या शेजारी दीपक आणि राहुल कदम राहतात. लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून भालकर आणि कदम यांच्यामध्ये मंगळवारी सायंकाळी वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी कदम यांनी माझ्या घरावर दगडफेक केली. दारातील खुर्च्यांची तोडफोड केली. छऱ्यांची पिस्तूल दाखवून दहशत निर्माण केल्याचे भालकर यांनी त्यांच्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार कदम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.