गवताची पेंडी कापल्याच्या कारणावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:42+5:302021-08-24T04:28:42+5:30

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी रेश्मा कुमार गायकवाड व नागेश गायकवाड पुसाळे गावचे रहिवाशी आहेत. फिर्यादी नात्याने दीर, भावजय ...

Fighting over the cause of grass cutting | गवताची पेंडी कापल्याच्या कारणावरून मारामारी

गवताची पेंडी कापल्याच्या कारणावरून मारामारी

Next

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी रेश्मा कुमार गायकवाड व नागेश गायकवाड पुसाळे गावचे रहिवाशी आहेत. फिर्यादी नात्याने दीर, भावजय आहेत. रविवार (दि. २२) सायंकाळी आठ वाजता नागेश गायकवाड, बाबू गायकवाड, अकुंश गायकवाड या तिघांनी कुमार गायकवाड यांच्या दारात जाऊन तू आमच्या बांधावरील गवताची पेंडी का कापलीस असे विचारून नागेश गायकवाड याने कुमार गायकवाड यांच्या डोक्यात काठी मारली. पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर ठार मारण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली. कुमार गायकवाड यांच्या डोक्यात वर्मी घाव लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील हिरा नर्सिंग होम मल्टीस्पेशालिटी अँड क्रिटिकल सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

Web Title: Fighting over the cause of grass cutting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.