दानोळीत दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:48+5:302021-03-14T04:22:48+5:30
जयसिंगपूर : रस्त्याच्या कारणावरुन दानोळी (ता. शिरोळ) येथे दोन गटात हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत काठीचा वापर करण्यात आला. ...
जयसिंगपूर : रस्त्याच्या कारणावरुन दानोळी (ता. शिरोळ) येथे दोन गटात हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत काठीचा वापर करण्यात आला. यामध्ये सहाजण जखमी झाले असून २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास सांगले मळा येथे घडली. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. राहुल कुबेर सांगले (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुमार पाटील, सन्मतकुमार भरमाज, प्रवीण पाटील, महावीर भरमाज, अशोक पाटील, रंजना भरमाज, जयश्री पाटील, पुष्पा पाटील, निकिता भरमाज, संजय पाटील, निमगोंडा पाटील तर जयश्री नेमगोंडा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहुल सांगले, कुबेर सांगले, नरसगोंडा सांगले, पायगोंडा सांगले, अशोक सांगले, अजित सांगले, वैभव सांगले, विपुल सांगले, नितीन सांगले, सुशिला सांगले, वैशाली सांगले, कमल सांगले व पोपट पाटील (सर्व रा. दानोळी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दोन्ही गटातील संशयित एकमेकांचे शेजारी असून रस्त्यावरुन न्यायालयात दावा सुरु आहे. शनिवारी सकाळी सांगले मळ्यातील गट नं. ११५७ मध्ये दोन्ही गटात वाद झाला. या वादाचे पर्यावसन मारामारीत झाले.