शेतातील पाणी पाजण्याच्या कारणावरुन दोन गटात मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 03:34 PM2020-06-23T15:34:53+5:302020-06-23T15:37:01+5:30
शेतातून पाणी नेण्याच्या कारणांवरुन दोन कुटूंबात कोयता, परळी व काठीने झालेल्या हाणमारीत दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले. ही घटना करवीर तालुक्यातील घानवडेपैकी चव्हाणवाडी येथे फाड नावाच्या शेतात सोमवारी सायंकाळी घडली.
कोल्हापूर : शेतातून पाणी नेण्याच्या कारणांवरुन दोन कुटूंबात कोयता, परळी व काठीने झालेल्या हाणमारीत दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले. ही घटना करवीर तालुक्यातील घानवडेपैकी चव्हाणवाडी येथे फाड नावाच्या शेतात सोमवारी सायंकाळी घडली.
या हाणामारीत रंगराव लक्ष्मण चव्हाण (वय ४०) त्याची पत्नी नकुशा व मुलगा दिपक चव्हाण यांच्यासह रंगराव लक्ष्मण चव्हाण व त्यांचे भाऊ बळवंत चव्हाण (सर्व रा. घानवडेपैकी चव्हाणवाडी) अशी दोन्ही गटातील जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घानवडेपैकी चव्हाणवाडी येथे रंगराव चव्हाण हे पत्नी नकुशा व मुलगा दिपक हे तिघे नाळवे नावाच्या आपल्या शेताकडे वाटेतून पाणी नेत याच कारणांवरुन बळवंत व महिपती चव्हाण या भावांनी त्यांच्याशी शिवीगाळ करुन त्यांना कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी रंगराव चव्हाण यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली.
याचप्रकरणी महिपती चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, शेतातील पाणी पाजण्याच्या कारणांवरुन रंगराव चव्हाण, त्याची मुले विकास व दिपक चव्हाण यांनी पारळी हत्यार व काठीने केलेल्या मारहाणीत महिपती व बळवंत चव्हाण हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात दोन्हीही बाजूने परस्पर विरोधी तक्रारी दाखल दाखल झाल्या
आहेत.