निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर्सवर गुन्हे दाखल करा- जिल्हाधिकारी देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:30 PM2020-08-05T22:30:49+5:302020-08-05T22:37:23+5:30

कोणा रुग्णाच्या बाबतीत निष्काळजीपणा करणार्‍या काळजी केंद्र तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स वर गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

File charges against negligent doctors- Collector Desai | निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर्सवर गुन्हे दाखल करा- जिल्हाधिकारी देसाई

निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर्सवर गुन्हे दाखल करा- जिल्हाधिकारी देसाई

Next
ठळक मुद्देनिष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर्सवर गुन्हे दाखल करा- जिल्हाधिकारी देसाईव्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा चांगला संवाद

कोल्हापूर :कोरोना रुग्णांच्या बाबतीत निष्काळजीपणा करणाऱ्या कोव्हिड काळजी केंद्र, कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टर्सवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उप विभागीय अधिकाऱ्यांना आज दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, नवीन कोव्हिड काळजी केंद्रात सुविधा पूर्ण करा. त्याचबरोबर आपल्या तालुक्याची वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेवून त्याची क्षमता वाढवावी. त्याबाबत तसे नियोजन करावे.

रुग्ण ठेवायला जागा नाही असं अजिबात होता कामा नये. रुग्णांचा आलेख कसा वाढत गेला ते पाहून प्रतिदिन क्षमता किती असावी याबाबत नियोजन करा.

ऑक्सिजन लाईन, ऑक्सिजन सिलेंडर याचेही नियोजन असायला हवे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्यस त्याची खरेदी करायला हरकत नाही. त्यात काही कमी पडू देवू नका. किमान 10 टक्के बेड हे ऑक्सिजनचे असायला हवे.

कोव्हिड रुग्णालयात आणि कोव्हिड काळजी केंद्रात काम न करणाऱ्या तसेच उपचाराबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर्सवर उप विभागीय अधिकारी यांनी गुन्हे दाखल करावेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

इचलकरंजी येथील आयजीएममधील नगरपालिकेच्या 42 जणांना तात्काळ करार पध्दतीने सेवेत सामावून घ्या, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, खासगी फिजिशयनच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार करावेत. त्यासाठी प्रत्येक केंद्राला मोबाईल देण्यात आला आहे त्याचा वापर करावा.

डॉ. साळे यांनीही तालुका निहाय कोव्हिड काळजी केंद्र तेथील सुविधा रॅपिट ॲन्टीजन किट टेस्टींग त्याबाबतच्या सुविधा याचा सविस्तर आढावा घेतला.
 

Web Title: File charges against negligent doctors- Collector Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.