फसवणूक प्रकरणी बालिंगा सराफाच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 06:12 PM2021-04-17T18:12:46+5:302021-04-17T18:28:41+5:30

Fraud Kolhapur Police  :  बालिंगा (ता. करवीर) येथील सराफ व्यवसायिक सतीश उर्फ संदीप पोवाळकर (सध्या रा. कनेरकरनगर) याच्या विरोधात आज करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन कोटी नऊ लाख ४० हजार ४२९ रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलिसात आहे. पोवाळकरबरोबर त्याचा मेहुणा अमोल पवार (रा. सातार्डे ता. पन्हाळा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed a case against Balinga Sarafa in a fraud case | फसवणूक प्रकरणी बालिंगा सराफाच्या विरोधात गुन्हा दाखल

फसवणूक प्रकरणी बालिंगा सराफाच्या विरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देफसवणूक प्रकरणी बालिंगा सराफाच्या विरोधात गुन्हा दाखलदोन कोटी ४० लाख फसवणूक

कोपार्डे  :  बालिंगा (ता. करवीर) येथील सराफ व्यवसायिक सतीश उर्फ संदीप पोवाळकर (सध्या रा. कनेरकरनगर) याच्या विरोधात आज करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन कोटी नऊ लाख ४० हजार ४२९ रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलिसात आहे. पोवाळकरबरोबर त्याचा मेहुणा अमोल पवार (रा. सातार्डे ता. पन्हाळा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळचा दोनवडे (ता. करवीर) येथील सतीश पोळकर बालिंगा येथे गेली दहा वर्षे सराफ व्यवसाय करत होता. आंबिका ज्वेलर्स नावाने त्याचे येथे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर ज्वेलरीचे दुकान आहे. त्याचा सोन्याचांदीचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. याच बरोबरच तो सोनेतारण कर्ज देत होता. या शिवाय तो अनेक लोकांकडून  पिग्मी व सुवर्ण ठेव नावाने ठेवी संकलित करत होता. यासाठी त्याने पिग्मी एजंट नेमले होते.

गेली आठ दिवस तो आपल्या कुटुंबासह बेपत्ता असल्याची कुणकुण लागताच गुरुवारी गुंतवणूकदारांनी त्याच्या दुकानासमोर ठिय्या ठोकला होता. त्यांच्या कनेरकरनगर व दोनवडे येथील घरी चौकशी केली, पण तो आठ दिवस घरातून निघून गेल्याचे समजले. तो बेपत्ता झाल्याचे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.

सतीश पोवाळकर व त्यांचा मेव्हणा अमोल पोवार याच्यावर राजेंद्र विष्णू चिवटे (रा. दोनवडे) यांच्यासह फसवणूक झालेल्या मुकुंद बोडके, विनायक चंद्रकांत गुरव, भाग्यश्री आयरेकर, नितीन माळी, अमित कानकेकर (बालिंगा), सर्जेराव पाटील (दोनवडे),  अमर डेंगे, दत्ता ढेरे, प्रियांका ढेंगे (नागदेववाडी) यानी आज करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  तक्रारी वरून करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Filed a case against Balinga Sarafa in a fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.