बुजवडेत थेट पाइपलाइनचा भराव कालव्यात कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:26 AM2021-07-28T04:26:32+5:302021-07-28T04:26:32+5:30

भरावा लवकर न काढल्यास पाण्याच्या दाबाने कालव्यात धोका निर्माण होऊ शकतो. खुदाईचे पुढील काम व्यवस्थित न झाल्यास ...

The filling of the pipeline directly into Bujwade collapsed into the canal | बुजवडेत थेट पाइपलाइनचा भराव कालव्यात कोसळला

बुजवडेत थेट पाइपलाइनचा भराव कालव्यात कोसळला

Next

भरावा लवकर न काढल्यास पाण्याच्या दाबाने कालव्यात धोका निर्माण होऊ शकतो. खुदाईचे पुढील काम व्यवस्थित न झाल्यास कामास विरोध करू, असा इशारा सरपंच सुनिता पाटील यांनी दिला आहे.

कोल्हापूर पाइपलाइनची खुदाई ही बेफिकीर झालेली असून, भराव हा अस्ताव्यस्त पडलेला आहे. या भागात पाऊस हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व चुकीच्या खुदाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांना व मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदरचा रस्त्यावर आलेला भराव महानगरपालिकेने काढून घेऊन रस्ता पूर्ववत वाहतुकीस खुला करावा तसेच उर्वरित पाइपलाइन खुदाईचे काम पाण्याचा प्रवाह बघून व्यवस्थित करावे, अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सुनिता पाटील व उपसरपंच बंडोपंत पाटील यांनी केली आहे.

फोटो ओळ- बुजवडे ता.राधानगरी येथे थेट पाइपलाइनचा कालव्यात आलेला मातीचा भराव.

Web Title: The filling of the pipeline directly into Bujwade collapsed into the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.