रांगडया कोल्हापूरच्या ‘द सॉॅकर सिटी ’ ला फिल्मफेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:26 PM2019-03-19T16:26:31+5:302019-03-19T16:29:38+5:30

शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाचा इतिहास मांडणारा सचिन बाळासाहेब सूर्यवंशी दिग्दर्शित केलेल्या ‘ द सॉकर सिटी’ या माहीतीपटास हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. तर या कार्यक्रमाचे खास निवेदन अभिनेता शाहरूख खान व रणवीर सिंग हे करणार आहेत.

Filmfare film 'The Soccer City' of Kolhapur, Kolhapur | रांगडया कोल्हापूरच्या ‘द सॉॅकर सिटी ’ ला फिल्मफेअर

रांगडया कोल्हापूरच्या ‘द सॉॅकर सिटी ’ ला फिल्मफेअर

Next
ठळक मुद्देरांगडया कोल्हापूरच्या ‘द सॉॅकर सिटी ’ ला फिल्मफेअरशंभर वर्षाचा फुटबॉल इतिहासावरील माहीतीपट

कोल्हापूर : शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्याफुटबॉल खेळाचा इतिहास मांडणारा सचिन बाळासाहेब सूर्यवंशी दिग्दर्शित केलेल्या ‘ द सॉकर सिटी’ या माहीतीपटास हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. तर या कार्यक्रमाचे खास निवेदन अभिनेता शाहरूख खान व रणवीर सिंग हे करणार आहेत.

कोल्हापूरची जशी कुस्ती रांगडी समजली जाते. तसाच फुटबॉल संस्थानकालापासून जगभरात प्रसिद्ध आहे. त्यात कोल्हापूरची तरूणाई तर वेडयासारखी या फुटबॉलवर प्रेम करते. यात फुटबॉलची परंपरा जपणारी कोल्हापूरची रांगडी मंडळीही आहे. त्यात फुटबॉल तालीम संघांची परंपरा ही तर जिव्हाळ्याचा विषय आहे. हीच बाब ध्यानी घेवून कोल्हापूरातील सचिन सुर्यवंशी या युवकाने निर्मिती केलेल्या ‘ द सॉकर सिटी’ या माहीतीपटाला फिल्मफेअरमधील माहीतीपट (नॉन फिक्शन) विभागातील पहीला क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले.

एकूण २५ मिनिटांचा असलेला या माहीतीपटाचे सह दिग्दर्शन यात फुटबॉल खेळाडू सतिश सुर्यवंशी यांनी केले आहे.लघुपट निर्मिती जरी ९० दिवसांत पूर्ण झाली असली तरी त्यासाठी तीन वर्षांहून अधिक काळ केवळ कोल्हापूर फुटबॉलचा अभ्यास केला होता. कोल्हापुरात होणारे फुटबॉलचे सर्व सामने, हंगामातील मोठ्या स्पर्धा पाहून त्याने हा माहितीपट बनवला आहे.

मुख्य म्हणजे निर्मिती केल्यानंतर प्रथमच फिल्मफेअरमध्ये हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनातच त्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. या माहीतीपटाचे सह दिग्दर्शन फुटबॉलपटू व महासंग्रामचे सतीश सुर्यवंशी यांनी, तर मराठी अभिनेते सागर तळाशीकर यांनी आवाज दिला आहे. अमित पाध्ये यांनी संगीत दिले आहे.

माहीतीपटाचे संपादन किरण देशमुख, छायाचित्रण पवन माने, अजित हारूगले, , समीर शेलार, मिनार देव, विराज यांनी सांंभाळले आहे. सब टायटल अर्निका परांजपे, विवेक पाध्ये यांनी दिले आहे. यातील सर्व कलाकार व चित्रिकरणही कोल्हापूरातीलच आहे. एकूण २५ मिनिटांचा हा माहीतीपट अहे.

माहितीपटाला आवाज प्रसिद्ध अभिनेते सागर तळाशीकर यांनी दिला असून, संगीत अमित पाध्ये, एडिटिंग किरण देशमुख, कॅमेरा पवन माने, अजित हारुगले, समीर शेलार, मिनार देव, विराज माने यांनी सांभाळला होता. सब टायटल अर्निका परांजपे आणि विवेक पाध्ये यांनी दिले आहे. मुख्य म्हणजे सर्व कलाकार हे कोल्हापूरचे असून माहितीपटाचे सर्व चित्रीकरणही कोल्हापुरात झाले आहे. या पुरस्कारामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सलग दुसरा फिल्मफेअर पुरस्कार कोल्हापूरला

मागील वर्षी २०१८ मध्ये कोल्हापूरचे उमेश बगाडे दिग्दर्शित ‘अनाहत’ या लघुपटासही सर्वाधिक प्रेक्षक पसंतीचा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानीत केले होते. तर यंदा कोल्हापूरच्या फुटबॉलवर केलेल्या ‘द सॉकर सिटी’ या माहीतीपटास हा मान मिळत आहे. ‘मायाद्विप ’, ‘एस.टी ७०’, ‘मै पल दो पल का शायर हू ’ हे माहीतीपटही या स्पर्धेत होते.


फुटबॉल आणि त्यात खेळणाऱ्या तालीम संस्था यांनी जपलेल्या खेळाची परंपरा, सामाजिक ऐक्य, सलोखा याचे दर्शन या माहीतीपटातून दाखविले आहे. फुटबॉलवरील माहीतीपटास फिल्मफेअर मिळाल्याने अतिशय आनंद झाला.
- सचिन सुर्यवंशी ,
दिग्दर्शक, ‘द सॉकर सिटी’

 

 

Web Title: Filmfare film 'The Soccer City' of Kolhapur, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.