कोल्हापुरात हॉलिवूडपटाचे चित्रीकरण

By admin | Published: January 26, 2017 12:48 AM2017-01-26T00:48:14+5:302017-01-26T00:48:14+5:30

कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायासाठी सकारात्मक बाब

Filming of Hollywood footage in Kolhapur | कोल्हापुरात हॉलिवूडपटाचे चित्रीकरण

कोल्हापुरात हॉलिवूडपटाचे चित्रीकरण

Next

कोल्हापूर : मराठी, हिंदी चित्रपटानंतर आता हॉलिवूडलादेखील कोल्हापुरातील लोकेशन्सची भुरळ पडली आहे. अमेरिकेतील ‘रिमेंम्बरिंग अ‍ॅम्नेशिया’ या चित्रपटाचे चित्रीकरण बुधवारपासून सुरू झाले आहे. यानिमित्ताने कोल्हापुरात प्रथमच हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरला जशी निसर्गाची देणगी लाभली आहे तसेच येथील पुरातन वास्तू जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे शिवाय येथील मातीतच चित्रपटसृष्टीची बिजे रुजली आहे. येथे मराठी, हिंदी चित्रपटांचे मालिकांचे चित्रीकरण होत असते. मात्र, हॉलिवूडपटातही येथील लोकेशन्स चमकणार आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेले निर्माते, दिग्दर्शक डॉ. रवींद्र गोडसे आणि ठकार प्रॉडक्शनच्यावतीने ‘रिमेंम्बरींग अ‍ॅम्नेशिया’ या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातील विविध लोकेशन्सवर होत आहे. या चित्रपटाच्या टीमसाठी महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसचे आनंद काळे, सर्जेराव पाटील आणि मिलिंद अष्टेकर गेल्या आठ महिन्यांपासून प्रयत्नात होते. त्यांनी मेलद्वारे मेरी वॉनलेस दवाखाना, रेल्वे स्टेशनसह विविध लोकेशन्सची छायाचित्रे चित्रपटाच्या टीमला पाठवली. त्यांना ही लोकेशन्स आवडल्यानंतर ही टीम मंगळवारी शहरात दाखल झाली. रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. कथानकातील अभिनेता काही दिवसांसाठी भारतात येतो आणि येथे त्याला आलेले अनुभव हा भाग कोल्हापूरसह गोव्यात चित्रीत करण्यात येत आहे. मूळचे भारतीय असलेले दिलीप राव या अभिनेत्याची यात मध्यवर्ती भूमिका आहे. त्यात हॉलिवूड कलाकारांसह अभिनेते महेश मांजरेकर, मेघा मांजरेकर, श्रृती मराठे, आनंद काळे, जयवंत वाडकर, विजय पाटकर, डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जीम लुडॉक्स हे मुख्य कॅमेरामन आहेत. ३१ तारखेपर्यंत चित्रीकरण चालणार आहे.


नवी सुरुवात
कोल्हापूर चित्रनगरी आता आकाराला येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हॉलिवूडपटाचे चित्रीकरण ही कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायासाठी सकारात्मक बाब असणार आहे. एका चित्रपटामुळे कलाकारांसह जवळपास शंभर जणांना रोजगार मिळतो. या चित्रपटासाठी तंत्रज्ञ, स्पॉटबॉय अशा पडद्यामागील ७५ जणांना काम मिळाले आहे.

Web Title: Filming of Hollywood footage in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.