बेल्जियममधील रिअॅलिटी शोचे चित्रीकरण कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:31 PM2018-11-30T17:31:29+5:302018-11-30T17:33:26+5:30
बेल्जियमच्या इकोलाईन संस्थेच्या वतीने आयोजित ‘एशिया एक्सप्रेस’ या आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोचे चित्रीकरण व स्पर्धा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून परदेशी स्पर्धक शहरातील विविध भागांत या शोचे टप्पे पूर्ण करीत आहेत.
कोल्हापूर : बेल्जियमच्या इकोलाईन संस्थेच्या वतीने आयोजित ‘एशिया एक्सप्रेस’ या आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शोचे चित्रीकरण व स्पर्धा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून परदेशी स्पर्धक शहरातील विविध भागांत या शोचे टप्पे पूर्ण करीत आहेत.
या स्पर्धेअंतर्गत स्पर्धकांना कोल्हापुरातील विविध स्थळांची हिंट दिली जाते. त्याद्वारे त्यांनी त्या स्थळांचा शोध घेणे अपेक्षित असते. या स्पर्धेत सुमारे आठ विदेशी स्पर्धक सहभागी झाले. संयोजक, कॅमेरामन असे सगळे मिळून ४० जणांचे पथक या स्पर्धेसाठी काम करीत आहे.
गुरुवारी (दि. २९) रंकाळा व मेन राजाराम हायस्कूल या परिसरांत याचा एक भाग पूर्ण करण्यात आला. शुक्रवारी सकाळी सात वाजता भवानी मंडपातून पुढील स्पर्धेला प्रारंभ झाला. रविवारी शाहू खासबाग मैदानात स्पर्धेचा पुढचा टप्पा पार पडणार आहे.