चित्रपटाच्या आमिषाने फसवणुकीचा संशय

By admin | Published: June 23, 2017 01:13 AM2017-06-23T01:13:37+5:302017-06-23T01:13:37+5:30

तरुणाला मारहाण : चित्रपट महामंडळाची पोलिसांत तक्रार

The film's bait is suspected of cheating | चित्रपटाच्या आमिषाने फसवणुकीचा संशय

चित्रपटाच्या आमिषाने फसवणुकीचा संशय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने परदेशात मुलींची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, सदस्यांसह जमावाने एका तरुणाला बेदम चोप देत शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. ही घटना न्यू शाहूपुरीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी घडली. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
याबाबत अधिक माहिती अशी, न्यू शाहूपुरीतील एका हॉटेलमध्ये संबंधित तरुण चार दिवसांपूर्वी आला. त्याने शहरातील विविध नृत्यवर्गांशी संपर्क साधला. आपल्याला चित्रपटाच्या आॅडिशनसाठी मुली पाहिजेत, असे सांगितले. त्यामुळे शहरातील काही नृत्यवर्गांच्या एक-दोन मुली या हॉटेलमध्ये या तरुणाला भेटण्यासाठी आल्या. दरम्यान, कोल्हापुरातील निर्माते अमोल कोळेकर यांच्याशी त्याची ओळख झाली. कोळेकर यांना त्याचा संशय आला. दोन दिवस कोळेकर यांनी त्याच्या हालचालींवर ‘लक्ष’ ठेवले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी हा प्रकार गुरुवारी सकाळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांना कार्यालयात जाऊन सांगितला. त्यानुसार दुपारी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह रणजित जाधव, शुभांगी साळोखे, सागर टिळके, भाऊ पाटील, अमर मोरे, आदी या हॉटेलमध्ये या तरुणाला जाब विचारण्यासाठी आले. त्यावेळी दोन मुली आॅडिशनसाठी येथे आल्या होत्या. थेट जमावाने या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडून वातावरण तणावपूर्ण बनले. त्यांनी या तरुणाला वाहनामधून शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

कोट :
मुला-मुलींच्य्या आॅडिशनसाठी पालकवर्गाने स्वत: त्याठिकाणी जावे. हा प्रकार बदनामी करणारा आहे. त्यामुळे आम्ही जागरूक होऊन याचा पर्दाफाश केला.
- मिलिंद अष्टेकर, माजी उपाध्यक्ष, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूर.


तीन वेगवेगळे पत्ते...
चित्रपट आॅडिशनसाठी ५ ते ७ जुलै या कालावधीत ३० रूम बुक केल्याची चर्चा यावेळी सुरू होती. त्याचबरोबर त्याने आपल्या व्हिजिटिंग कार्डवर बंगलोर येथील पत्ता दिला आहे. इंटरनेटवरून त्याच्यासंबंधी माहिती घेतली असता त्याचा इंदोर, पुणे, बंगलोर असे पत्ते आढळले.

Web Title: The film's bait is suspected of cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.