अंतिम प्रभाग रचना जाहीर; बारा प्रभागात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:21+5:302021-02-06T04:41:21+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना गॅझेटसह राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच प्रसिद्ध केली. त्याची माहिती ...

Final ward composition announced; Twelve ward changes | अंतिम प्रभाग रचना जाहीर; बारा प्रभागात बदल

अंतिम प्रभाग रचना जाहीर; बारा प्रभागात बदल

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना गॅझेटसह राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच प्रसिद्ध केली. त्याची माहिती महापालिका प्रशासनास प्राप्त झाली. प्रभाग रचनेत सहा प्रभागांत बदल झाले असून, त्याचा परिणाम बारा प्रभागांवर कमी अधिक प्रमाणात झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना केली होती, त्यावर हरकती, सूचना मागवून घेऊन सुनावणीअंती त्या अंतिम करण्यात आल्या.

त्यामुळे सर्वात मोठा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक ७० राजलक्ष्मीनगर हा गणला जाणार असून, येथे ७०३९ इतके मतदार आहेत. सर्वांत लहान प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक दहा शाहू कॉलेजचा समावेश करण्यात आला असून, त्याची मतदारसंख्या ३७३८ इतकी आहे. प्रभाग क्रमांक १८ महाडिक वसाहत या नावात बदल करीत तो ‘महाडिक वसाहत - पाटोळेवाडी’ असे नामकरण केले आहे.

अंतिम प्रभाग रचनेत झालेल्या बदलानुसार प्रभाग क्रमांक ८, कदमवाडी भोसलेवाडी हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, या प्रभागातील ११३३ मते नजीकच्या प्रभाग क्रमांक ९, कदमवाडी या सर्वसाधारण प्रभागाकडे वळविण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक ३९, राजारामपुरी एक्‍स्टेंशन या प्रभागात प्रभाग क्रमांक ६४ शिवाजी विद्यापीठ येथील ५२४ मते वाढविण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक ३१ बाजारगेट या प्रभागातील ४७८ मते प्रभाग क्रमांक ३० खोलखंडोबा या प्रभागात वळविण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक २३ रुईकर कॉलनी येथील २७८ मते प्रभाग क्रमांक १६, शिवाजी पार्कमध्ये वळविली आहेत. प्रभाग क्रमांक ५६ चंद्रेश्‍वरमधील ४३० मते प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यानाकडे वळविली आहेत. प्रभाग क्रमांक ६९ तपोवनमधील ६२२ मते प्रभाग क्रमांक ७०, राजलक्ष्मीनगर येथे वळविली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वांत मोठा प्रभाग म्हणून हा प्रभाग गणला जाणार आहे. या प्रभागाची मतदारसंख्या ७९३९ इतकी झाली आहे.

Web Title: Final ward composition announced; Twelve ward changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.