Election: महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छूक लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 12:56 PM2022-05-14T12:56:04+5:302022-05-14T13:22:10+5:30

या अंतिम प्रभाग रचनेत नेमके काय बदल झाले आणि किती प्रभागात कशा प्रकारचे बदल झाले आहेत याची नेमकी माहिती उपलब्ध झाली नाही.

Final ward composition for municipal elections announced | Election: महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छूक लागले कामाला

Election: महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छूक लागले कामाला

googlenewsNext

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार केलेली अंतिम प्रभाग रचना अखेर शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर झाली. अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट जाहीर करण्याच्या लेखी सूचना आयोगाने येरवडा मुद्रणालयास दिल्या होत्या.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून पुढे सुरू कराव्यात आणि निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दि. ४ मे रोजी दिले होते. त्यानुसार आयोगाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकांच्या अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा गॅझेटद्वारे जाहीर करण्यात येणार होता. तशा लेखी सूचना आयोगाने येरवडा मुद्रणालयास दिल्या होत्या.

या अंतिम प्रभाग रचनेत नेमके काय बदल झाले आणि किती प्रभागात कशा प्रकारचे बदल झाले आहेत याची नेमकी माहिती उपलब्ध झाली नाही. महानगरपालिका अधिकारी रात्री बारा वाजल्यापासून प्रारुप आणि अंतिम प्रभाग रचनेची छाननी करत होते. आज, शनिवारी याबाबत नेमकी माहिती मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात महानगरपालिकेचे प्रारूप प्रभाग आराखडे तयार करण्यात आले होते. आयोगाच्या मान्यतेने दि. १ फेब्रुवारी रोजी शहरवासीयांना पाहण्यासाठी खुले करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. प्रारुप प्रभाग रचनेवर शहरातून ११५ हरकती आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावर साखर आयुक्त शेखर गायकवड, प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर प्रारूप प्रभाग रचना अंतिम मंजुरीकरिता आयोगाकडे पाठविण्यात आली होती. दि. ४ मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करायची होती; परंतु त्यानंतर मात्र निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आली.

३२ वाॅर्ड, ९२ नगरसेवक

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरात ३२ वाॅर्डांची रचना केली असून त्यातून ९२ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. पाच ते सहा वॉर्डांत काही किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेत फारसा बदल होणार नाही, असे सांगण्यात येते. यानिमित्ताने निवडणुकीचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला.

Web Title: Final ward composition for municipal elections announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.