अखेर ‘दौलत’चा तिढा सुटला

By admin | Published: May 1, 2016 01:03 AM2016-05-01T01:03:51+5:302016-05-01T01:03:51+5:30

तत्त्वत: मान्यता : ‘न्यूट्रीयन्टस’ला ४५ वर्षांसाठी भाड्याने देणार

Finally, Daulat was released | अखेर ‘दौलत’चा तिढा सुटला

अखेर ‘दौलत’चा तिढा सुटला

Next

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी साखर कारखाना न्यूट्रीयन्टस फु्रटस प्रा. लि. गोकाक या कंपनीस ४५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तत्त्वत: मान्यता देण्यात आली. पंधरा दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या असून, गेली अनेक वर्षे बँकेच्या गळ्याभोवती अडकलेला ‘दौलत’चा तिढा अखेर सुटल्याने बँक संचालकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
‘दौलत’ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी ‘न्यूट्रीयन्टस’ने ४५ व ६० वर्षांचे दोन प्रस्ताव दिले होते. त्यावर चर्चा होऊन जिल्हा बँक संचालकांनी ४५ वर्षांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामध्ये जिल्हा बँकेची सगळी थकबाकी २०२३ पर्यंत कंपनी देणार आहे. कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी बॅँकेची काही रक्कम राखून ठेवण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला. सिक्युअर्ड क्रेडिटर्स यांचे १०२ कोटी ३६ लाख ८५ हजार अधिक व्याज हे २०२२ अखेर मर्यादित राहणार आहे.
कारखाना बंद असल्याने बँकेबरोबर चंदगड परिसरातील शेतकरी, कामगार अडचणीत सापडला होता. मध्यंतरी काही कंपन्यांनी चालविण्याची तयारी दाखवली, पण बऱ्याच घडामोडी झाल्या आणि त्यांनी नकार दिल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कंपनी व बँकेचे चार्टर्ड अकौंटंट तसेच बँकेचे कायदा सल्लागार यांच्या अभिप्रायानुसार कंपनीस मान्यतापत्र देणार असल्याचेही त्यांनी सागिंतले. उपाध्यक्ष अप्पी पाटील, के. पी. पाटील, निवेदिता माने यांच्यासह संचालक उपस्थित होते.

काय आहे प्रस्ताव -
४बॅँकेचे ६७.५० कोटींपैकी ३३.७० कोटी मार्च २०१७ पर्यंत जमा करणे, पैकी १६.८० कोटी ताबा घेताना द्यावे लागणार. उर्वरित ५० टक्के रकमेचे व्याज व मुद्दलाचे सहा वार्षिक हप्ते करून त्यावर १२ टक्के व्याज अदा करण्यात
येणार आहे.
४एसडीएफचे देणे ७२.५० लाख २०१७ पर्यंत, २०१८ ते २०२२ पर्यंत प्रतिवर्षी
१ कोटी ७२ लाख १३ हजार रुपये १० टक्के व्याजासह अदा करायचे आहेत.
४बॅँकेने कारखान्याचे ना हरकत पत्र देणे.
४आवश्यक शासकीय मान्यता करारापूर्वी बँकेने देणेचे आहे.
४शासकीय देय रकमामध्ये काही सवलत मिळाली तर भाड्यातून ती वजा करण्यात येईल.
४कामगार देणेबाबत युनियन किंवा वैयक्तिक कामगारांशी चर्चा करून तडजोड केली जाईल.
४कारखाना ताळेबंद कंपनी लेखापरीक्षकाकडून निश्चित करून संबंधित सिक्युअर्ड देणी दिली जातील.
४करारातील दायित्वाखेरीज कंपनी कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही.
सप्टेंबरपर्यंत चाचणी हंगाम
कारखान्याचा गाळप परवाना कायम राहण्यासाठी सप्टेंबरपर्यंत चाचणी गळीत हंगाम घेणे बंधनकारक आहे. ‘न्यूट्रीयन्टस’ कंपनीने याची तयारी केल्याने परवान्याची काही अडचण येणार नसल्याचे बॅँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: Finally, Daulat was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.