अखेर जुना बुधवार पेठ येथील १०० वर्षांपूर्वीची ती झाडे तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 01:53 PM2020-01-30T13:53:20+5:302020-01-30T13:55:41+5:30
या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी रोजी ताराराणी गार्डन येथील निवडणूक शाखा कार्यालयात सुनावणी घेतली.
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी दोन झाडे अखेर महानगरपालिकेच्या प्रशासनाने बुधवारी जेसीबीद्वारे तोडून टाकली. याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतलेल्या सुनावणीतील मुद्दे निकालात काढले. या निर्णयामुळे पोलिसांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.
जुना बुधवार पेठ परिसरातील सि. स. नं. २९३५ अ, सी वॉर्ड या जागेत पोलिसांसाठी १९२ घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. या बांधकामाच्या ठिकाणी एकूण ९७ झाडे आहेत. त्यांपैकी बांधकामाला अडथळा ठरत असलेली कॅशियाची दोन, अशोकाची तीन, पिंपळाचे एक तसेच बदामाचे एक अशी सात झाडे तोडण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडून महापालिकेचे आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरण समितीकडे मागण्यात आली होती. या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी रोजी ताराराणी गार्डन येथील निवडणूक शाखा कार्यालयात सुनावणी घेतली.
या सभेत वृक्षप्रेमींच्या वतीने कलाशिक्षक मिलिंद यादव, शिवप्रभा लाड आणि पक्षिमित्र सतपाल गंगलमाले यांनी आपली मते मांडली आणि पुरावे सादर केले; तर पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे आणि आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी यांनी आपली मते मांडली. पाच हरकतदार उपस्थित न राहिल्याने त्यांचे अर्ज निकाली काढण्यात आले. यात आठ मुद्द्यांवर चर्चा झाली आणि अडथळा ठरणारी झाडे ही कोणत्याही प्रकारची परिसंस्था तयार करीत नाहीत; त्यामुळे स्थानिक प्राणी व वनस्पती यांचे जीवनचक्र खंडित होत नाही अथवा बिघडत नाही; त्यामुळे हरकतदारांचे सर्व मुद्दे निकाली काढण्याचा आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर या परिसरातील सर्व झाडे जेसीबीद्वारे तोडण्यात आली.
कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी दोन झाडेअखेर महानगरपालिकेच्या प्रशासनाने बुधवारी जेसीबीद्वारे तोडून टाकली.
(- संदीप आडनाईक)
अखेर जुना बुधवार पेठ येथील १०० वर्षांपूर्वीची ती झाडे तोडली
महापालिकेने घेतला निर्णय : सुनावणीतील मुद्दे आयुक्तांच्या आदेशाने निकाली
लोकमत न्यूज नेटवर्क