अखेर परतीच्या पावसाने दिलासा

By admin | Published: September 10, 2015 12:48 AM2015-09-10T00:48:47+5:302015-09-10T00:48:47+5:30

सर्वत्र कमालीचा गारवा : दमदार हजेरीने बळिराजा सुखावला; शहरात फेरीवाल्यांची तारांबळ

Finally, the relief from the fall back | अखेर परतीच्या पावसाने दिलासा

अखेर परतीच्या पावसाने दिलासा

Next

कोल्हापूर : गेले महिनाभर चातकासारखी वाट पाहायला लावल्यानंतर बुधवारी दुपारनंतर पावसाने सगळ््यांनाच थंडगार करून टाकले. महिन्याचा उन्हाळा व एका दिवसाचा पावसाळा याचीच अनुभूती पावसाने आणून दिली.
शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी दिवसभर परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाले भरून वाहिले. बळिराजासह उकाड्याने हैराण झालेले लोक सुखावले. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला. शहरातील फेरीवाले, पादचारी, दुचाकीस्वार यांची तारांबळ उडाली.
गेली दोन दिवस उष्म्याने भाजून काढले होते. त्यामुळे कधी एकदा पाऊस येतो अशी आस सगळ््यांनाच लागून राहिली होती. सकाळी तसे वातावरण तयार झाले. पावसाची चाहूल लागली; परंतु परत सूर्य तापू लागला. दुपारी साडेबाराच्या सुमारास आकाशाचा नूर पालटला. काळ््या ढगांची गर्दी झाली. आणि बघता बघता पावसाची सर आली. दोन महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस नाही. केवळ आकाशात ढगांची गर्दी होत होती. मात्र, पावसाला जोर नव्हता. यामुळे ऐन पोसवण्याच्या अवस्थेत असलेली पिके धोक्यात आली. पावसाने तीन आठवडे पूर्णपणे पाठ फिरविली. सकाळी आणि रात्री थंडी आणि दिवसभर कडाक्याचे ऊन असे वातावरण राहिले. सप्टेंबर महिना असूनही त्यात ‘आॅक्टोबर हीट’ जाणवत होती. भरवशाची सर्व नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे बळिराजाने जोरदार पावसाची आशा सोडली होती. वाळत असलेली पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. पाण्याची सुविधा असलेल्या ठिकाणचा शेतकरी तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणी देत आहे. दरम्यान, पुष्य नक्षत्र सुरू झाल्यामुळे वातावरणात बदल झाला.
दोन महिने गायब
दोन महिन्यांपासून शहर, परिसर, जिल्हा येथून संततधार पाऊस गायब झाला होता. गगनबावडा, राधानगरी, चंदगड या तालुक्यांत एक ते सहा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला. १ सप्टेंबरनंतर जिल्ह्यात एक थेंबही पाऊस पडला नाही. त्यामुळे हे पावसाळ्याचे दिवस आहेत, हेच सारेजण विसरून गेले होते.

Web Title: Finally, the relief from the fall back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.