अखेर बिद्रीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 05:11 PM2017-09-07T17:11:32+5:302017-09-07T17:19:05+5:30
गेली दोन वर्षे गाजत असलेले बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचे बिगुल अखेर आज, गुरुवारी वाजले.
कोल्हापूर, दि. ७ : गेली दोन वर्षे गाजत असलेले बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचे बिगुल अखेर आज, गुरुवारी वाजले.
बिद्री कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शुक्रवार दि.८ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दि. ८ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून, उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
बुधवारी छाननी होणार असून दि. १४ सप्टेंबरपासून २८ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी चिन्हे वाटप होणार असून दि. ८ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दि. १0 आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पुणे येथील निवडणूक प्राधिकरणाने या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. लोकमतने सर्वप्रथम निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याचे वृत्त दिले होते. यासंदर्भातील राजकीय घडमोडीचे वृत्तही लोकमतने सर्वप्रथम प्रसिद्ध केले आहे.