गडहिंग्लजमध्ये जळीतग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:15+5:302021-05-25T04:28:15+5:30
गडहिंग्लज : शॉर्टसर्किटने आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गादी कारखान्याच्या जळीतग्रस्त कुटुंबाला शहरातील सुन्नी जुम्मा मस्जिद, मोहम्मदीया अरबी मदरसा व ...
गडहिंग्लज : शॉर्टसर्किटने आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गादी कारखान्याच्या जळीतग्रस्त कुटुंबाला शहरातील सुन्नी जुम्मा मस्जिद, मोहम्मदीया अरबी मदरसा व मदिना मस्जिदतर्फे सामाजिक बांधीलकी जपत नदाफ कुटुंबीयांना ६० हजारांची आर्थिक मदत दिली.
शहरातील कुंभारवाड्यातील रिंगरोडलगत ईरशाद पापालाल नदाफ यांचा गादी, सोफासेट व कोचिंग करण्याचा कारखाना आहे. चार दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटने कारखान्यात आग लागून कारखान्यातील तयार केलेल्या गाद्या, खुर्च्या, बेडशीटचे कापड, कापूस पिंजण्याचे मशीन, ५ एच.पी. मोटर व शेड असे मिळून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
कोरोना महामारीतच आगीनेही नदाफ कुटुंबीयावर आघात केल्याने उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोतच नाहीसा झाल्याने खचलेल्या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे..
यावेळी नगरसेवक हारुण सय्यद, मौलाना फहीम मुल्ला, आशपाक मकानदार, कबीर मुल्ला, मौलाना अजिम पटेल, इकबाल शायन्नावर, शकील जमादार, जमीर नदाफ, जावेद गवंडी, फिरोज मकानदार, आदी उपस्थित होते.
-
---
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे गादी व्यावसायिक ईरशाद नदाफ यांना आर्थिक मदत देताना मुस्लिम बांधव. यावेळी नगरसेवक हारुद सय्यद, आशपाक मकानदार, इकबाल शायन्नावर, फहीम मुल्ला, आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : २४०५२०२१-गड-०६