जिल्हा बँकेकडून व्यावसायिक गटांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:33+5:302021-06-27T04:17:33+5:30
जिल्हा बँकेकडून व्यावसायिक गटांना अर्थसहाय्य जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांच्या गटांना ६ ...
जिल्हा बँकेकडून व्यावसायिक गटांना अर्थसहाय्य
जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांच्या गटांना ६ कोटींचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री व बँकेचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. नाबार्डच्या धोरणानुसार हे अर्थसहाय्य करण्यात येणार असून, याबाबत जिल्हा बँक व बुबनाळ येथील कृषी विकास विज्ञान मंडळ यांच्यात महत्त्वपूर्ण असा सामंजस्य करार करण्यात आल्याचेही यड्रावकर यांनी सांगितले.
राज्यमंत्री यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने यांच्याहस्ते कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष अनिल केरीपाळे यांना करारपत्र देण्यात आले. यावेळी अनिल पाटील, विलासराव गाताडे, आर. के. पोवार, राजेश लाटकर, असिफ फरास, सी. ए. रावण, आर. आर. स्वामी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी बाळसो माने, दीपाली केरीपाळे, अमित नागपुरे, राजू मुल्ला उपस्थित होते.
फोटो - २६०६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जिल्हा बँक व बुबनाळ येथील कृषी विकास विज्ञान मंडळ यांच्यात करार करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, डॉ. ए. बी. माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.