जनता गृहतारणकडून पूरग्रस्त साळगाव शाळेला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:19+5:302021-09-02T04:50:19+5:30
शाळेतील शिक्षकांनी विविध सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जनता सहकारी गृहतारण संस्थेने ...
शाळेतील शिक्षकांनी विविध सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जनता सहकारी गृहतारण संस्थेने १० हजारांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे, संचालक डाॅ. अशोक बाचुळकर, व्यवसथापक मधुकर खवरे यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर यांच्याकडे सुपूर्द केला. अध्यक्षस्थानी वसंत माडभगत होते.
या वेळी बाचुळकर यांनी जनता गृहतारण संस्थेेनेफक्त नफा न मिळवता सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले आहेत. माणसे जोडण्याचे काम संस्था करत आहे, असे सांगितले. या वेळी अध्यक्ष मारुती मोरे यांनीही संस्थेच्या कार्याचा व सरपंच सघटनेमार्फत तालुका पातळीवर करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. या शाळेतील शिक्षकानी हे संकट हे संधी समजून शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असेही सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे कर्मचारी जयवंत येरुडकर, संतोष निऊंगरे, निवृती मिटके उपस्थित होते. सत्यवान सोन्ने यांनी सूत्रसंचालन केले. संजय मोहिते यांनी आभार मानले.
फोटो ओळी : साळगाव (ता. आजरा ) येथील पूरग्रस्त प्राथमिक शाळेला जनता गृहतारण संस्थेकडून आर्थिक मदत मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर यांना देताना अध्यक्ष मारुती मोरे, डॉ. अशोक बाचूळकर, मधुकर खरे आदी उपस्थित होेते.
क्रमांक : ०१०९२०२१-गड-०२