आरे ग्रामस्थांसाठी राज्यभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 03:42 PM2019-08-30T15:42:15+5:302019-08-30T15:50:54+5:30

करवीर तालुक्यातील शंभर टक्के पूरग्रस्त गाव असलेल्या आरे गावांने आम्हांला धान्याची मदत आता पुरे, ही मदत अन्य गावांना द्या अशी भूमिका घेतल्याने आता या गावांसाठी आर्थिक स्वरुपातील मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आपल्याला पुरेशी मदत मिळाल्यावर नको म्हणायची दानत गावांने दाखविल्याने त्याची समाजातून चांगली प्रतिक्रिया उमटली आहे. शुक्रवारपर्यंत सव्वातीन लाखांवर रोख मदत जमा झाली आहे.

Financial help for the villagers has begun | आरे ग्रामस्थांसाठी राज्यभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरु

आरे ग्रामस्थांसाठी राज्यभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरु

Next
ठळक मुद्देआरे ग्रामस्थांसाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरुराज्यभरातून निधी : सव्वातीन लाखांवर रक्कम जमा

सडोली खालसा : करवीर तालुक्यातील शंभर टक्के पूरग्रस्त गाव असलेल्या आरे गावांने आम्हांला धान्याची मदत आता पुरे, ही मदत अन्य गावांना द्या अशी भूमिका घेतल्याने आता या गावांसाठी आर्थिक स्वरुपातील मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आपल्याला पुरेशी मदत मिळाल्यावर नको म्हणायची दानत गावांने दाखविल्याने त्याची समाजातून चांगली प्रतिक्रिया उमटली आहे. शुक्रवारपर्यंत सव्वातीन लाखांवर रोख मदत जमा झाली आहे.

यंदाच्या महापुरात या गावाला मोठा तडाखा बसला. त्यात सुमारे ३० हून अधिक घरांची पडझड झाली. दुकाने, शेती सेवा केंद्राचे नुकसान मोठे झाले. गावांला जीवनावश्यक वस्तूंची खूप मोठी मदत झाली. परंतू एका टप्प्यावर गावांने आता आम्हांला ही मदत नको अशी जाहीर भूमिका घेवून त्याचे फलकच चौकात लावले. त्याऐवजी ज्यांना शक्य असेल त्यांनी आर्थिक स्वरुपातील मदत करावी असे आवाहन केले होते. त्यास लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

आतापर्यंत रोख मदत केलेल्या लोकांची नांवे अशी : (प्रत्येकी ५१ हजार ) - सखाराम फर्निचर-शंकर पाटील शेळेवाडी, पुणे शहर पोलिस व डेक्कन वाहतूक टीम आणि मराठा प्रतिष्ठान बंगळूर प्रत्येकी ५० हजार, कोप्रान लिमिटेड रायगड (प्रकाश वेदांते, धनाजी मेटिल, गाडेगोंडवाडी व भोगावतीचे संचालक धीरज डोंगळे - प्रत्येकी २५ हजार, संतोष पोर्लेकर आरे - २१ हजार, राम हॉटेल्स खार मुंबई (जी.एस.तिबिले वाशी)- २० हजार, तेरसवाडी ग्रामस्थ-१२ हजार, इंडियन आर्मी ग्रुप (विक्रम सावेकर येळवडे, प्रताप रोडे, वैभव दळवी व सूरज जाधव कोल्हापूर, रविंद्र गुंजाळ, अमोक कदम पुणे, नितीन-अहमदनगर, दयाराम-नागपूर ) १० हजार, सावरवाडी ग्रामस्थ - ९१००, कणेरीचे ग्रामसेवक ए.बी.तिवले, ग्रामसेवक विलास राबाडे, मोजणी अधिकारी बी.एन.पाटील देवाळे, चंद्रभागा उर्फ सुनिता जयसिंग वाडकर खेबवडे यांनी प्रत्येकी ५ हजार. रघुनाथ गुंडाप्पा पाटील, देवाळे - २ हजार. पंडित यशवंत कंदले,सावरवाडी-१५०० आणि पुणे पोलिस संदिप मारुती कोपार्डे यांच्याकडून पूरग्रस्त मानसिंग पाटील यांना १५ हजारांची मदत.
 

 

Web Title: Financial help for the villagers has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.