अतिवृष्टीचा कोल्हापुरात एसटीला फटका, १६ लाखांचे उत्पन्न पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:48 PM2024-07-29T12:48:19+5:302024-07-29T12:49:50+5:30

सीबीएस, रंकाळा बसस्थानक पडले ओस

Financial loss of 16 lakh 80 thousand due to cancellation of 1379 ST rounds of Kolhapur Agar due to heavy rain | अतिवृष्टीचा कोल्हापुरात एसटीला फटका, १६ लाखांचे उत्पन्न पाण्यात

कोल्हापुरातील रंकाळा बसस्थानक रविवारी प्रवाशांविना ओस पडले. (छाया : नसीर अत्तार)

कोल्हापूर : अतिवृष्टीचा मोठा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसला आहे. कोल्हापूर आगाराच्या १३७९ फेऱ्या रद्द झाल्या असून १६ लाख ८० हजारांचा आर्थिक फटका बसला आहे. सुटीच्या दिवशी प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक आणि रंकाळा बसस्थानक ओस पडले.

एसटीच्या बारा आगारांना महापुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. दररोज विविध मार्गांवरील ७० हून अधिक फेऱ्या रद्द केल्या आहेत. रविवारी बारा आगारांतील १३७९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये ६४ हजार ४०१ किलोमीटरचा प्रवास थांबला. तर १६ लाख ८० हजार ९३४ रुपयांचे उत्पन्न बुडाले. केवळ कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या संभाजीनगर, गडहिंग्जल, गारगोटी मार्गावरील २०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. महापुराचा अंदाज घेऊन बहुतांशी मार्गावरील वाहतूक बंद झाली.

शिरोली आणि तावडे हॉटेल परिसरात पुराचे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही रद्द झाल्या. मध्यवर्ती बसस्थानकात दिवसभरात २०० तर रंकाळा बसस्थानकात २० ते २५ असे तुरळक प्रवासी होते. मध्यम आणि लांब पल्ल्याच्या एसटी रद्द केल्या.

आगारनिहाय रद्द फेऱ्या / बुडालेले उत्पन्न

कोल्हापूर ११४ / १५२६५३
संभाजीनगर २९२ / २६७२४८
इचलकरंजी ५८ / ५५१५०
गडहिंग्लज २३६ / २७६०९०
गारगोटी २०१ / ३६०१००
मलकापूर ९२ / १७१८७५
चंदगड १२७  /८७३४४
कुरुंदवाड १६४ / १३१८५०
राधानगरी ४० / ७०२७४
गगनबावडा ४० / ९०९३८
आजरा १५  / १०९७२
एकूण १३७९ / १६ लाख ८० हजार ९३४

Web Title: Financial loss of 16 lakh 80 thousand due to cancellation of 1379 ST rounds of Kolhapur Agar due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.